Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Bigg Boss Marathi 6 -Vishal Kotian : बिग बॉसचे घर विशालने डोक्यावर घेतले. विशाल घरातील सर्वांशी पंगा घेतो. त्याचे आणि राखीचे भांडण होते.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरातून रुचिता जामदारची एक्झिट झाली.

रुचिता गेल्यावर विशाल घरातील सर्वांशी पंगा घेतो.

विशाल आणि राखीमध्ये मोठे भांडण होते.

'बिग बॉस मराठी 6'मध्ये (Bigg Boss Marathi 6 ) 9 वा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात रुचिता घराचा निरोप घेते. ज्यामुळे विशालला मोठा धक्का बसतो. तो खूप रडतो. पहिल्या दिवसापासून रुचिता आणि विशाल एकत्र दिसले. रुचिता बाहेर गेल्यामुळे टोळी अखेर फुटली. आता बिग बॉसच्या घरात विशाल आपला नवीन गेम प्लान खेळायला तयार झाला आहे. त्याने थेट संपूर्ण घराशी पंगा घेतला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखी सावंत म्हणते की, "हा सोफा आहे, इथे सर्वांना बसायचं आहे..." त्यावर विशाल बोलतो की, "मी बाहेर होतो तेव्हा बेड का नाही नीट लावला..." त्यावर उत्तर देत संस्कृती बोलते, "सोफ्यावर सर्व तुझे सामान विस्कटलेले होते..." त्यावर राखी शेवटचे विशालला विचारते की, "तू उठणार आहेस की नाही? की मी इथे पाणी टाकू" यावर विशाल संतापून उत्तर देतो की, "ठीक आहे टाक पाणी... मी पण सगळ्यांच्या बेडवर पाणी टाकेन..."

त्यानंतर राखी पाण्याने भरलेले बकेट घेऊन येते आणि बेडवर टाकते हे पाहून तन्वी खूप मोठ्याने ओरडते. तन्वी राखीला पाणी टाकण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करते. मात्र राखी तिचे न ऐकता पाणी टाकते. राखीचे घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष असते. आता विशाल खरंच सर्वांच्या बेडवर पाणी टाकणार का? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "विशाल साऱ्या घराशी पंगा घेणार...राखी त्याच्या इराद्यावर पाणी फेरणार!" या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. विशालचा हा नवा गेम प्लान असल्याचे बोलत आहे. विशाल रुचिता घरातून गेल्याचे दुःख न करता, पुन्हा एकदा गेमसाठी लढताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात 9 व्या आठवड्यात कोण नॉमिनेट होते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? समुद्रात दडलंय रहस्य

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

SCROLL FOR NEXT