Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : खानदेशच्या किंगची बिग बॉसच्या घरातून Exit, सचिन कुमावतच्या शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहते नाराज

Sachin Kumavat Eliminated From Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6' मधून सचिन कुमावत बाहेर पडला आहे. घराबाहेर जाताना रितेश देशमुख त्याचे खूप कौतुक करतो.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरातून सचिन कुमावतची एक्झिट झाली.

रितेश देशमुख सचिन कुमावतचे खूप कौतुक करतो.

सचिनच्या जाण्याने घरातील सदस्य खूपच भावुक होतात.

'बिग बॉस मराठी 6' सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. सहाव्या आठवड्यात खानदेशचा किंग सचिन कुमावत बिग बॉसच्या घराचा निरोप घेतो. सहाव्या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले होते. यात प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद, रुचिता जामदार, राकेश बापट, सचिन कुमावत, अनुश्री माने, रोशन भजनकर आणि सागर कारंडे यांचा समावेश आहे. काल भाऊच्या धक्क्यावर गायक सचिन कुमावतने घरातून एक्झिट घेतली.

नऊ सदस्यांमधून बॉटम-3 मध्ये रुचिता जामदार, रोशन भजनकर आणि सचिन कुमावत होते. तिघांना तीन दरवाजांसमोर उभे केले. गार्डन एरियातील दरवाजासमोर सचिन उभा होता, तोच दरवाजा उघडतो आणि सचिनचा घरातील प्रवास संपतो. सचिन घराबाहेर जाताच सदस्य खूपच भावुक होतात. त्याला घट्ट मिठी मारतात. खूप रडतात.

घराबाहेर पडल्यावर सचिन कुमावत स्टेजवर येतो. आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल भावना व्यक्त करतो. तसेच घरातील सर्व सदस्यांचे, प्रेक्षकांचे, चाहत्यांचे आणि रितेश भाऊंची आभार मानतो. तो खूप भावुक होतो. त्यानंतर सचिनचा प्रवास दाखवण्यात आला. तो घरात कायम सदस्यांना सांभाळून घेताना दिसला. बाहेर आल्यावर सचिन म्हणाला, "भाऊ बिग बॉसच्या घरातील प्रवास खूप सुंदर होता. येथे खूप गोष्टी शिकलो. येथे माझ्या खानदेशची ओळख मी निर्माण करू शकलो."

सचिनचे कौतुक करत रितेश भाऊ म्हणाले की, "या घरातला चांगला माणूस कोण तर सचिन भाऊ, दीड महिन्यांत महाराष्ट्रात तुम्ही एक वेगळी आणि खूप चांगली ओळख निर्माण केली आहे. ही अशी ओळख या घरात राहून निर्माण करणे खरंच सोपे नाहीये..." सचिनच्या एक्झिटनंतर घरातील सदस्य खूपच भावुक झाले. तन्वी आणि प्राजक्ता खूप रडल्या. आता बिग बॉसचा सातवा आठवडा सुरू झाला आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT