Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

BB Marathi 6 Prajakta- Anushri Argument : बिग बॉसच्या घरात ड्युटीवरून वादाला सुरुवात झाली. सदस्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात अनुश्री आणि राकेशमध्ये खूप मोठे भांडण होते.

अनुश्रीने प्राजक्ताला शिव्या दिल्या आहेत.

बिग बॉसच्या घरी ड्युटीवरून वादाला पुन्हाला सुरुवात झाली.

बिग बॉसच्या घरात गेले काही दिवस तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनुश्री मानेने ती झोपेत असताना राकेश बापटने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण घर अनुश्रीच्या विरोधात पाहायला मिळत आहे. तसेच राकेश देखील दुःखावला आहे. अशात आता बिग बॉसच्या घरात शिवीगाळ झाला आहे. ज्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असतात. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये देखील प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओत प्राजक्ता आणि अनुश्री एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना दिसत आहेत. अनुश्रीचे म्हणते की, "आम्ही ड्युटी नाही करणार..." त्यावर प्राजक्ता म्हणते "काय मूर्ख आहे यार... " तिला उत्तर देत अनुश्री म्हणाली, "हो मूर्ख आहे आम्ही, तुझ्यासारखे ... "

प्राजक्ता हे सर्व किचनमध्ये दीपाली सय्यदला जाऊन सांगते. तेव्हा दीपाली अनुश्रीला विचारायला येते की, "काय ग तू शिव्या देतेस?" त्यावर अनुश्री म्हणाली, "आईला घेऊन आलीस तू?" प्राजक्ता म्हणाली, "अक्कल आहे का तुला? बावळट..." एकंदर काम न करण्यावरून प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये भांडण होते. ज्यात अनुश्री प्राजक्ताला शिव्या देते. त्यामुळे घराचे वातावरण चांगलेच बिघडते.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात भाऊचा धक्का खूपच गाजणार आहे. राकेश-अनुश्रीचा वाद, अनुश्री-प्राजक्तामधील वाद खेळात अजून कोणता ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. घरात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Politics: मनसेनं शिंदे सेनेला का दिला पाठिंबा? राजू पाटलांनी सांगितली सत्ताकारणाची Inside Story

Shocking : अशक्तपणा आला, अंगात विष पसरलं अन् जागीच मृत्यू झाला; २० वर्ष जुन्या बाटलीतून कॉफी पिणं पडलं महागात

Earcuffs Earings Designs: मराठमोळ्या सौंदर्यावर उठून दिसतील असे कानातले, हे आहेत ट्रेडिंग लेटेस्ट 5 पॅटर्न

महापौरपदावरून ट्विस्ट! आधी ठाकरे गटाची अन् भाजपची गुप्त बैठक, आता काँग्रेस मोठा डाव टाकणार

EPFO 3.0: UPIद्वारे PFचे पैसे मिळणार; एकावेळेला किती निघेल रक्कम? वाचा नवे अपडेट

SCROLL FOR NEXT