Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात येणार राखी सावंत? सदस्यांना सळो की पळो करणार, खऱ्या अर्थाने आता गेम सुरू

Rakhi Sawant Entry In Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात आता हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. कारण घरात राखी सावंत येणार असल्याचे बोले जात आहे. सविस्तर अपडेट वाचा.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरातून दिव्या शिंदे बाहेर पडली आहे.

बिग बॉसच्या घरात राखी सावंत येणार असल्याचे बोले जात आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सदस्यांची चांगली शाळा घेणार आहे.

बिग बॉसच्या घरातून नुकतीच दिव्या शिंदेची एक्झिट झाली आहे. घरातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. ज्यामुळे या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्याचे बोले जात आहे. अशात आता सोशल मीडिया एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे बोले जात आहे.

राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंत 'बिग बॉस मराठी 6' मध्ये झळकणार आहे. सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये राखी सावंतचा घरातील एक फोटो पाहायला मिळत आहे. राखी सावंतची 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात राखी सावंत वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार नसून ती फक्त 15 दिवसांसाठी शो मध्ये दिसणार असल्याचे बोले जात आहे. म्हणजे दोन आठवडे घरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. राखी सावंत पाहुणी कलाकार म्हणून 'बिग बॉस मराठी 6' मध्ये दिसणार आहे.

राखी सावंत या आधीही आपल्या हटके स्टाइलने हिंदी आणि मराठी बिग बॉस गाजवले आहे. आता  'बिग बॉस मराठी 6'मध्ये राखी सावंत कुणाला टार्गेट करणार, घरात राखीसोबत कोण भांडताना दिसणार हे सर्वच पाहणे मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे-

ओमकार राऊत

आयुष संजीव

सचिन कुमावत

प्रभू शेळके

दिपाली सय्यद

अनुश्री माने

दिव्या शिंदे

रोशन भजनकर

राकेश बापट

आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून तीन सदस्य बाहेर गेले आहेत. यात राधा पाटील, सोनाली राऊत आणि दिव्या शिंदे यांचा समावेश आहे. आता चौथ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT