Bigg Boss Marathi 6 Winner SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

BBM 6 Winner - Tanvi Kolte : रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फनाले थाटामाटात पार पडला. तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' तन्वी कोलते जिंकली.

तन्वीला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

अभिनेता राकेश बापट 'बिग बॉस मराठी ६'चा उपविजेता ठरला.

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच अक्षय तृतीयाला पार पडला. आज रितेश भाऊंनी ‘बिग बॉस मराठी ६’चा विजेता घोषित केला. मराठी अभिनेत्री तन्वी कोलतेचे (Bigg Boss Marathi 6 Winner - Tanvi Kolte) ‘बिग बॉस मराठी ६’च्या ट्रॉफीवर नाव कोरले गेले. बिग बॉसची राणी आणि टास्क क्वीनने अखेर बाजी मारली.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ च्या विजेत्याला म्हणजेच तन्वी कोलतेला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळाले. त्यासोबतच स्कूटी आणि सोन्याचे दागिने भेट म्हणून मिळाले.

टॉप-५ फायनलिस्ट कोण होते?

  1. तन्वी कोलते

  2. राकेश बापट

  3. अनुश्री माने

  4. विशाल कोटियन

  5. दिपाली सय्यद

‘बिग बॉस मराठी ६’ चे स्पर्धक

दीपाली सय्यद, सागर कारंडे, राकेश बापट, सोनाली राऊत, विशाल कोटियन, अनुश्री माने, राधा पाटील, करण सोनवणे, आयुष संजीव, तन्वी कोलते, प्रभू शेळके, रुचिता जामदार, सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर, दिव्या शिंदे, ओमकार राऊत या १७ सदस्यांचा समावेश होता. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंत, रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंखे यांचा समावेश होता.

बिग बॉस मराठी सीझन १ ते सीझन ५ चे विजेते

  • बिग बॉस मराठी सीझन १ - मेघा धाडे

  • बिग बॉस मराठी सीझन २ - शिव ठाकरे

  • बिग बॉस मराठी सीझन ३ - विशाल निकम

  • बिग बॉस मराठी सीझन ४ - अक्षय केळकर

  • बिग बॉस मराठी सीझन ५ - सूरज चव्हाण

‘बिग बॉस मराठी ६’चा ग्रँड फिनाले आज रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळाला. आता कलाकार मंडळी आणि चाहते तन्वी कोलतेला शुभेच्छ देताना आणि तिचे कौतुक करताना दिसत आहेत. चाहत्यांना आता ‘बिग बॉस मराठी ७’ ची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संततधार पावसाचा फटका; कुनघाडा रयतवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले पाणी

वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार; बुलढाण्यातून पाच जणांच्या टोळीला अटक

Home Remedies : अळूची भाजी सोलताना हाताला खाज येते? आजीच्या बटव्यातले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

भाजपच्या विरोधात शिंदेसेनेचे जोरदार आंदोलन, सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात, नगरसेवक थेट महापालिकेच्या गेटवर चढले

SCROLL FOR NEXT