Bigg Boss Marathi 6 Runner Up Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Runner Up: बिग बॉस मराठी ६ च्या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने ट्रॉफी जिंकत सर्वांना चकित केले. राकेश बापट उपविजेता ठरला. जाणून घ्या संपूर्ण फिनाले अपडेट्स.

Shruti Vilas Kadam

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडत आहे.

ग्रँड फिनालेचे होस्टिंग रितेश देशमुख करत आहे.

'बिग बॉस मराठी ६ ' तन्वी कोलतेने जिंकली ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Runner up: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चत असलेला 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले आज १९ एप्रिलला थाटात पार पडला. 'बिग बॉस मराठी ६' ला आपला विजेता भेटला आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तन्वी कोलतेने उचलली आहे. बिग बॉसच्या सुरूवातीपासून तन्वी कोलतेचे नाव विजेतेपदासाठी चर्चेत होते. तर यावेळी राकेश बापट हा स्पर्धक उपविजेता ठरला आणि प्रेक्षकांसह सगळ्यांना मोठा धक्का बसला कारण राकेश बापट हा स्पर्धक विजेता होणार असल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले खूपच रंगतदार झाला. यावेळी बिग बॉसच्या घरातील पाचही फानलिस्टने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केले. बिग बॉस मराठी ६च्या पाचही फानलिस्टच्या चाहत्यांना त्यांना आवडत असलेल्या स्पर्धकाने या शोची ट्रॉफी जिंकावी असे वाटत होते. पण शेवटी बिग बॉस मराठी ६ च्या ट्रॉफीवर तन्वी कोलतेने आपले नाव कोरले.

या वेळी ग्रँड फिनालेमध्ये विशेष आकर्षण म्हणून जेनेलिया देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. तर शोचे स्पर्धक यावेळी उपस्थित होते. या ग्रँड फिनालेमध्ये टॉप 5 स्पर्धक राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद त्यामध्ये आधी दिपाली सय्यद बाहेर गेली. नंतर अनुश्री माने, तिच्या पाठोपाठ विशाल कोटियन हा स्पर्धक यानंतर उपविजेता राकेश बापट हा स्पर्धक ठरला तर तन्वी कोलते हा स्पर्धक विजेता ठरला.

१६ स्पर्धक

या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. त्यामध्ये राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, आयुष साळुंखे, करण सोनावणे, सचिन कुमावत, रुचिता जामदार, रोशन भजंकर, प्रभू शेळके, संकेत पाठक, सागर कारंडे, संस्कृती आणि राखी सावंत यांचा समावेश होता. गेल्या तीन महिन्यांत या शोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता ग्रँड फिनालेचा दिमाखदार सोहळा थाटामाटात पार पडून बिग बॉस मराठी ६चा विजेता मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ८ दिवसांच्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरलं, पाण्याचं टेन्शन मिटलं

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT