Bigg Boss Marathi 6 grand finale forth player anushree mane eliminated  Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस मराठी 6'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले आता उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचला आहे. आता बिग बॉस मराठीचा ६ सीझनचा चौथा स्पर्धक बाद झाला असून आता तीन स्पर्धक बाकी आहेत.

Shruti Vilas Kadam

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडत आहे.

ग्रँड फिनालेचे होस्टिंग रितेश देशमुख करत आहे.

'बिग बॉस मराठी ६ 'च्या फिनालेला येऊन स्टाँग स्पर्धकाचा पत्ता कट झाला.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले आता उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. जवळपास 100 दिवस चाललेल्या या प्रवासात घरातील सदस्यांमध्ये मैत्री, वाद, टास्क आणि भावनिक क्षणांचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. महाराष्ट्राचा लाडका होस्ट रितेश देशमुख याच्या सूत्रसंचालनामुळे यंदाचा सीझन विशेष रंगला.

ग्रँड फिनालेदरम्यान एलिमिनेशनची पार पडले आणि त्यामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. टॉप ४ मध्ये तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि राकेश बापट हे स्पर्धक होते. ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन खूपच धक्कादायक ठरले. यावेळी हे एलिमिनेशन वाजत गाजत झाले यावेळी सर्व स्पर्धकांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली आणि त्यातून नाचत अनुश्री मानेला डान्सर्स बाहेर घेऊन गेले

टॉप ३ स्पर्धक

राकेश बापट

तन्वी कोलते

विशाल कोटियन

आता अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या खेळ, व्यक्तिमत्त्व आणि रणनीतीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदाचा विजेता कोण ठरणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. त्यामध्ये राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, आयुष साळुंखे, करण सोनावणे, सचिन कुमावत, रुचिता जामदार, रोशन भजंकर, प्रभू शेळके, संकेत पाठक, सागर कारंडे, संस्कृती आणि राखी सावंत यांचा समावेश होता. गेल्या तीन महिन्यांत या शोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता ग्रँड फिनालेच्या अंतिम क्षणांमध्ये कोण ट्रॉफी उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT