Bigg Boss Marathi 6 Winner saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

BBM 6 Grand Finale - Vishal Kotian Eliminated : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून मास्टर माइंड स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. टॉप २ मध्ये राकेश आणि तन्वी पोहचले.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून आतापर्यंत अनुश्री माने आणि दिपाली सय्यद बाहेर पडली आहे.

ग्रँड फिनालेला अभिषेक बच्चन आणि जिनिलीया देशमुख आले.

टॉप २ मधून घरातील मास्टर माइंड स्पर्धकाचा पत्ता कट झाला.

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले चांगलाच रंगला आहे. आतापर्यंत घरातून तीन सदस्य बाहेर पडले आहे. दिपाली सय्यद आणि अनुश्री मानेने बिग बॉसच्या घराला रामराम ठोकला. नुकताच बिग बॉसच्या घरातून अजून एका सदस्याचा पत्ता कट झाला आहे. टॉप ३ मध्ये तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन होते. बॉलिवूड आणि टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता विशाल कोटियन बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे.

आतापर्यंत 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेमध्ये जिनिलिया देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची एन्ट्री झाली. तसेच घरातील सदस्यांनी आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ केले. दिपाली सय्यद, राखी सावंत यांनी भन्नाट डान्स केला. सचिन कुमावत, आयुष संजीव आणि ओमकार राऊतने आपल्या डान्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

टॉप २ फायनलिस्ट

कोण होणार विजेता?

'बिग बॉस मराठी ६ ' च्या सुरुवातीपासून विजेतेपदासाठी तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन यांची नावे सर्वात जास्त चर्चेत आहे. मात्र आता विशाल कोटियन घराचा निरोप घेतला आहे. 'काटा' गटाचा सदस्य उरले आहेत. त्यामुळे तन्वी कोलते की राकेश बापट कोण ट्रॉफी उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. आता काही मिनिटांत रितेश भाऊ 'बिग बॉस मराठी ६ ' चा विजेता घोषित करतील.

ग्रँड फिनाले कुठे पाहाल?

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले आज 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच रविवारी पार पडत आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

मी स्वत: वकील...; भाजपच्या विरोधात लढाई सुरू, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

2 माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, भ्रष्टाचाराविरोधात भारतात कडक कायदे कधी?

सुप्रिया सुळेंनी अपघात झाल्यानंतर ठेवलं स्टेटस अन् प्रवाशांना दिला महत्वाचा संदेश

SCROLL FOR NEXT