Bigg Boss Marathi 6 Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: 'तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही...'; प्राजक्ता-अनुश्रीची कॅट फाईट, प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ च्या २०व्या दिवशी अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात जोरदार वाद झाला आहे. प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मधील दिवस २० चा नवीन प्रोमो पाहिल्यावर घरात अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात जोरदार वाद ओघळतोय, ज्यामुळे शोच्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रोमोच्या सुरुवातीस अनुश्री प्राजक्ताला टोचून म्हणते की प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा काहीच क्लास नाही, जे ऐकून प्राजक्ता “कारण तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही” असे पलटून म्हणते. त्यानंतर अनुश्री तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तुझी मानसिकता आहे. तुला गेम कळतच नाहीये,” असं प्राजक्ताला म्हणते. यावर 'मी शिकतीये, पण तुझ्यासारखी वाईट होत चालली नाहीये,” असं प्राजक्ता अनुश्रीला म्हणते.

ही कॅट फाइट लवकरच आणखी रंगतदार होणार आहे. सोशल मिडियावर हा प्रोमो व्हायरल होताना दिसतोय. नेटकर्‍यांनी या वादावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी अनुश्रीची बाजू घेतली तर काहींनी प्राजक्ताची बोलणे अधिक बरोबर असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, अनुश्री बरोबर बोली तर दुसऱ्याने कमेंट केली, टोळी आहे म्हणून बिग बॉस पाहण्यात मज्जा येत आहे. तर आणखी एकाने लिहीले, अनुश्री पेक्षा गटार बरा.

‘बिग बॉस मराठी ६’ चा सध्याचा भाग जसा पुढे जात आहे तसं घरातील वातावरण तणावपूर्ण आणि संघर्षाने भरले आहे. हा शो कलर्स मराठीवर आणि जिओ होटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रात्री 8 वाजता प्रसारित होतो. येत्या भागात स्पर्धकांना कोणते नविन चॅलेंज मिळणार हे पाहणं अधिक उत्सुकाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT