Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : सूरजचा गुलीगत धोका; साखरपुड्याचा VIDEO टाकून धक्का दिला, पण...

Suraj Chavan Engagement Video : 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणने नुकतीच सोशल मीडियावर एक खास रील शेअर केली आहे. या रीलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने सुरुवातीला सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातला.

सूरज चव्हाणचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अखेर सूरज चव्हाणच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस उजाडला आहे. ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सूरजने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ टाकून चाहत्यांना मोठा आनंदाच धक्का दिला आहे. सूरजने आपल्या साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याची होणारी बायको देखील दिसत आहे. या व्हिडीओला सूरजने एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "अखेर आनंदाचा दिवस उजाडला..." त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये सूरज मुलीला पाहायला कुटुंबासोबत तिच्या घरी कारने जाताना दिसत आहे. सूरजने खूपच सुंदर काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. सूरज व्हिडीओमध्ये स्टायलिश दिसत आहे. सूरजची होणारी बायको त्याला पाणी देते तेव्हा सूरज तिच्याकडे एकटक पाहत राहतो. त्यानंतर दोघांचा साखरपुडा होताना दिसत आहे. अखेर दोघे एकमेकांसोबत छान वेळ घालवत मनसोक्त हसताना दिसत आहेत. मात्र व्हिडीओचा शेवट खूपच धक्कादायक होतो.

व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की, सूरजचा हा साखरपुडा त्याच्या स्वप्नात होत असतो. सूरज चव्हाण आपल्या लग्नाचे सुंदर स्वप्न पाहत असतो. सुरुवातीच्या व्हिडीओचमध्ये खरचं वाटते की, सूरजने साखरपुडा केला आहे. मात्र हा फक्त एक प्रँकचे असतो. सूरज चाहत्यांना गुलीगत धोका देऊन त्यांचे मनोरंजन करतो. व्हिडीओच्या शेवटी सूरज स्वप्नातून उठताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून मजेशीर कमेंटचा पाऊस पडत आहे. एकंदर सूरज चव्हाणचा साखरपुडा झाला नसून त्याने प्रेक्षकांसोबत प्रँक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT