Suraj Chavan Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

Suraj Chavan Get Emotional: 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

सूरज चव्हाण हा 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता ठरला.

गुलीगत किंगने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत सूरज खूप भावुक होऊन आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 5'मुळे प्रसिद्धी मिळालेला सूरज चव्हाण (suraj Chavan ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. डान्स रील शेअर करतो. 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता झालेल्यानंतर गुलीगत सूरज चव्हाण केदार शिंदे यांच्या 'झापुक झूपूक' चित्रपटात झळकला. त्यानंतर त्यांने आपल्या नवीन घरात प्रवेश केला. तसेच अलिकडेच सूरज चव्हाणचे संजनासोबत लग्न झाले आहे. अशात आता सूरज पुन्हा एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

नुकताच 'झी चित्र गौरव' पुरस्कार थाटामाटात पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थितीत लावली. या भन्नाट कॉमेडी, डान्स यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या सोहळ्यात एका परफॉर्मन्स दरम्यान 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. ज्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या स्किटचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. मात्र याबद्दल एक खंत व्यक्त करत सूरजने नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडीओत सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाला?

सूरज चव्हाण व्हिडीओत म्हटल्याप्रमाणे, 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्याला न बोलावल्यामुळे त्याचे मन दुखावले आहे. 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात सूरज चव्हाणचे कॅरेक्टर प्ले करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याच्या टीमने सूरजला फोन देखील केला नाही, सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले आहे. तसेच सूरजला त्याचे कॅरेक्टर प्ले करणाऱ्या कलाकाराचा अभिनय देखील खूप आवडला आहे. सूरजने त्याचे कौतुक केले. तसेच तो म्हणाला, "माझे फॅन्स ते कॅरेक्टर पाहून खूप हसले, याचा मला खूप आनंद आहे..." झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्याला सूरज कुठे दिसला नाही, याची त्याला खंत आहे... "

सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सूरजचे चाहते त्याच्या मताशी सहमत आहेत. "दादा तू ब्रँड आहेस मग तुझी कॉपी होणारच ना", काळजी करू नकोस सूरज दादा आम्ही तुझ्या सोबत आहोत...", "हो आमंत्रण केलं पाहिजे होते... तू नाराज नको होऊ , वाईट नको वाटून घेऊ..." अशा कमेंट्स व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. सूरज चव्हाण हा प्रसिद्ध रील स्टार आहे. चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT