Suraj Chavhan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : सूरजच्या नातेवाईकांना मारहाण, नेमकं घडलं तरी काय?

Suraj Chavan Relatives Beaten : सूरजला भेटायला आलेल्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi ) विजेता सूरज चव्हाण झाला आहे. त्यांनी यंदाची ट्रॉफी उचलून हा मान पटकावला आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सूरजने प्रेक्षकांवर जादू केली आहे. आता त्याचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. सूरजचं (Suraj Chavhan) अभिनंदन करण्यासाठी त्याला अनेक लोक भेटायला जात आहेत. नुकताच सूरजला भेटण्यासाठी आलेल्यांना लोकांना मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे.

बिग बॉस विजेता सूरजला भेटण्यासाठी काही लोक त्याच्या गावाला गेली होती. तेव्हा बारामतीमधील मोढवे गावच्या लोकांनी त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ७ ऑक्टोबर रोजी सूरजच्या चाहत्यांसोबत मारहाण झाली. सूरजचे नातेवाईक फिर्यादी हे त्याला भेटण्यासाठी मोढवे गावच्या घरी गेले होते. फिर्यादीसोबत भाऊ संजय बोराडे, अजय खलसे, अविष्कार खोमणे, आदिनाथ बोडरे हे आले होते.

सूरजचे नातेवाईक रात्री मरिमाता मंदिरासमोर गप्पा मारत बसले असताना दुचाकीवरून काही लोक येतात आणि त्यांना विचारतात की, तुम्ही सूरज चव्हाणला भेटण्यासाठी का आला आहात? तसेच ती लोक दांडक्याने मारहाण करायला लागतात. पायावर आणि मांडीवर घाव घालतात. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करतात आणि ते तिथून निघून जातात. फिर्यादीला जेजुरीतील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

SCROLL FOR NEXT