Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : 'माझा सिनेमा सगळे रेकॉर्ड मोडणार...', गुलीगत सूरज नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Shreya Maskar

सध्या सर्वत्र सूरज चव्हाणची (Suraj Chavan) हवा पाहायला मिळत आहे. सूरजनं 'बिग बॉस मराठी 5' विजेतेपदक भूषवले आहे. त्याला महाराष्ट्रातून भरपूर प्रेम मिळाले आहे. सूरज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. बारामतीत त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.

बिग बॉसचा विजेता आता नवीन रूपात पाहायला मिळणार आहे. सूरजच्या आगामी चित्रपट 'राजा राणी' याचा (Raja Rani Movie) ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा लाँच सोहळा मोढवे गावातील आई मरीमाताच्या चरणी पार पडला आहे. बारामतीत सूरज चव्हाणच्या हस्ते 'राजा राणी'चा ट्रेलर लाँच करण्यात आला. या लाँचला बिग बॉस मराठी फेम वैभव चव्हाण देखील आला होता. चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सूरज म्हणाला की, "ज्याप्रमाणे बिग बॉस जिंकलो, त्याच प्रमाणे माझा राजा राणी चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार"

'राजा राणी' चित्रपटात सूरज महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. छोटा पडदा गाजवलेला सूरज आता मोठा पडदा गाजवणार आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या मुलाने आता मोठी प्रगती केली आहे. 'राजा राणी' चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात सूरजसोबत रोहन पाटील, तानाजी गळगुंडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री यांना एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सूरजचा यातही गोलीगत पॅटर्न पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Politics : भुजबळ-कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण, VIDEO

Health Tips: बुलेटप्रूफ कॉफी तुम्ही प्यायलात का? वाचा आश्चर्यकारक फायदे

Mumbai 26/11 Attacks:...तर माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बनं उडवून द्या; रतन टाटा यांनी थेटच सांगितलं होतं, VIDEO

Assembly Election: भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का; संजय काकडेंसह 10 आजी-माजी आमदार, 20 नगरसेवक फुंकणार तुतारी

SCROLL FOR NEXT