Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Saam Tv

बिग बॉस मराठी सीझनचा ५वा सीझनला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. बिग बॉसचा यंदाचा सीझन सर्वात जास्त TRP मिळवणारा सीझन ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे. प्रेक्षकांकडून रितेश भाऊंच्या होस्टिंगला भरपूर पसंती मिळाली आहे.

बिग बॉस मराठी सीझन ५च्या पहिल्याच दिवशीपासून सदस्यांमधील राडे, आरडा ओरड आणि राडे पाहायला मिळाले आहेत. घरातील सर्व सदस्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांच्या मनामध्ये स्वत:चे वेगळे स्थान मिळवले आहे.

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला. यामध्ये बिग बॉसच्या घरातील टॉप ६ सदस्यांमधील ५ सदस्यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. त्यासोबतच एका सदस्यानी बिग बॉसची ट्रॉफी आपल्यानावावर केली आहे. बिग बॉस मराठीच्या टॉप ६ मध्यून जान्हवी किलेकर सर्वात पहिल्यांदा ९ लाख रुपये घेऊन घरातच्या बाहेर पडली आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांच्या वोटींगनुसार जान्हवी ६व्या क्रमांकावर घरातून बाहेर जाणार होती. त्यानंतर सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून ५व्या क्रमांकावर बाहेर पडली. घरातून बाहेर येताच अंकिताने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.

चौथ्या अॅलिमिनेशन राऊंडपूर्वी घरातील सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गोर्डन एरियामध्ये बोलावले. बिग बॉसच्या घरातून डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार चौथ्या क्रमांकावर घराच्या बाहेर पडले आहेत. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची एन्ट्री झाली. अलिया भटने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बिग बॉसच्या मंचावर घोषणा केली. त्यानंतर घरातील टॉप ३ म्हणजेच निक्की, अभिजीत आणि सूरजला चक्रव्यूच्या खर्चीवर बसण्यास सांगितले.

टॉप ३ दरम्यान घरातील सदस्यांसह प्रेक्षकांच्या मनातील धाकधूक देखील वाढताना दिसली आणि निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. निक्कीनंतर घरामध्ये सर्वांचा लाडका सूजर आणि अभिजीत हे सदस्य बिग बॉस मराठीच्या घरातील टॉप २ सदस्य ठरले. त्यानंतर रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि सूरज यांना बोलवले.

बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनच्या विजेताचे नावच्या घोशणेपूर्वी रितेश भऊंनी सूरज आणि अभिजीतेचे भरपूर कोतुक केले आहेत. त्यानंतर गुलिगत म्हणजेच सूरज चव्हान बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझन विजेता ठरला तर अभिजित सावंत उपविजेता ठरला. सूरजचा घरातील प्रवास काही सोपा न्हवता परंतु त्यांने सर्वांच्या मनामध्ये त्याचे वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सूरज चव्हान त्याच्या रिल्समुळे तर प्रसिद्ध होताच परंतु बिग बॉसच्या विजेतांच्या यादीमध्ये त्याने त्याचे नाव कोरले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT