Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : शंभर टक्के इंटेशनल होत...भाऊने आर्याला झापलं, बिग बॉस अंतिम निर्णय काय घेणार?

Aarya Jadhao : बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कमुळे झालेल्या राड्यावर बिग बॉसने आपला निर्णय सांगितला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडलेलं पाहयला मिळत आहे. घरात रोज नवीन राडा आणि वाद पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन घरातील सदस्य करत आहेत. नुकताच झालेल्या निक्की आणि आर्याच्या राड्यामुळे घरातील वातावरण खराब झाले आहेत. तसचे प्रेक्षकांनाही हे फारसे न पटल्यासारखे आहे. आर्याच्या वागण्यामुळे बिग बॉसने देखील कठोर शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीच्या थोबाडीत मारून बिग बॉस घराचे नियम मोडले आहे. कॅप्टन्सी टास्क दरम्यान मोती ताब्यात घेण्याच्या झटापटीत आर्याला राग अनावर होऊन आर्या (Arya Jadhav) निक्कीच्या कानशिलात लगावते.

आर्याला शिक्षा देताना बिग बॉसने म्हटलं की, निक्की आणि आर्यामध्ये झालेला वाद बिग बॉसने पाहिला असून निक्की आर्याला धक्का देते, त्यामुळे आर्याला राग येऊन ती निक्कीला थोबाडीत मारते. पण हे हिंसात्मक कृत्य मान्य नाही. आर्याने असे कृत्य करून बिग बॉसच्या प्रमुख नियमाचं उल्लंघन केलं आहे. जे बिग बॉस खपवून घेणार नाही. त्यामुळे याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल आणि तोपर्यंत आर्या जेलमध्ये राहतील.

बिग बॉसच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख, (Riteish Deshmukh) आर्याला आपल्या वर्तणूकीसाठी चांगलंच खडेबोल सुनावले आहे. रितेश भाऊ म्हणतात की, तुम्ही स्वतःला काय समजता... राग आला तुम्ही कोणावरही हात उचलता... आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के इंटेशनल होत. असं बोलून पुढे बिग बॉसला आपला निर्णय सांगण्याची विनंती रितेश भाऊ करतात.

आर्याने निक्कीच्या थोबाडीत मारल्यावर निक्की बिग बॉसकडे तिला बाहेर काढण्याची किंवा स्वतःला बाहेर काढण्याची मागणी करते. तर आर्याच्या अशा बेताल वागाण्याचे बिग बॉसने सर्मथन केले नाही. बिग बॉसने आपली पहिली शिक्षा आर्याला दिली आहे. बिग बॉसने आर्याला जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिली आहे. तसेच यावर मोठी आणि महत्त्वाची शिक्षा शनिवार-रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर स्वतः रितेश देशमुख सांगणार आहे. त्यामुळे आता भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. आर्याला बिग बॉसने शिक्षा दिली असली तरी, चाहत्यांना तिचा पाठिंबा मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT