Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: तू फक्त भवऱ्यासारखी फिरते...; अरबाज निक्कीवर भडकला; बिग बॉसच्या घरात पुन्हा तुफान राडा, VIDEO

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाजमध्ये कडाक्यांचे भांडण होताना दिसत आहे.

Siddhi Hande

'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व सुरु होऊन अवघे काही आठवडे झाले आहेत. या काहीच दिवसांमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहे. तर काही स्पर्धक कुटुंबियांच्या आठवणीने भावूक होताना दिसत आहे. 'बिग बॉस'च्या घरात वाद, राडा होणे हे काही नवीन नाही. सध्या बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप पडले आहेत. या ग्रुपमध्ये नेहमी भांडणे होताना दिसत आहेत.आता घरात निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहे. निक्की आणि अरबाजमधील या भांडणाने घरात मोठा राडा होणार आहे.

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडवरुन शोचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत सुरुवातील निक्की अभिजीत सावंतची माफी मागताना दिसत आहे. निक्की म्हणते की, 'मी खरंच तुझी मनापासून माफी मागतेय'. त्यावर अभिजीत म्हणतो, 'हो तू नेहमीच मनापासून माफी मागते'.मात्र, या गोष्टींचा राग अरबाजला आल्याचे दिसत आहे.यानंतर अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण होते. अरबाज निक्कीला म्हणतो की, 'तू नुसती फिर. तू पण भवऱ्यासारखी फिरतेय. आता तिकडे गेली'. यावर निक्की अरबाजला ओरडून म्हणते की', मी नाही फिरत'. त्यानंतर या दोघांमध्येही जोरदार भांडण होते. दोघेही त्यांच्यासमोरील वस्तू फेकून देतात. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच निक्की आणि अरबाजमध्ये एवढ्या मोठ्याने भांडण झाल्याचे दिसत आहे.

'बिग बॉस'च्या या प्रोमोमुळे आता टीम ए मध्ये फुट पडणार का असणार प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. बिग बॉसच्या घरात वीकेंडला रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. वैभव, निक्कीला चांगलेच खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT