Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: निक्कीचं प्रेम अन् अरबाजची आदळआपट; शिक्षा मात्र सर्वांनाच; भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार?

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka Promo: भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस रितेश देशमुख नक्की कोणाचा हिशोब घेणार?

Manasvi Choudhary

बिग बॉसच्या घरात दर शनिवारी आणि रविवारी भाऊचा धक्का हा कार्यक्रम पार पडतो.या कार्यक्रमात बिग बॉस रितेश देशमुख स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतो. संपूर्ण आठवड्यात स्पर्धकांमध्ये झालेली मैत्री, प्रेम, वाद, नवीन टास्क यामध्ये नेमकं काय घडलय? याबाबत स्पर्धकांची कानउघडणी करतो.. नुकताच भाऊचा धक्का नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा भाऊच्या धक्का नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये, बिग बॉस रितेश देशमुख आज सर्व स्पर्धकांची शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरूवातीला रितेश देशमुख म्हणतोय, "बिग बॉसच्या घराला भुतानं झपाटलंय, काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलंय, तर याच नादाच सगळ्याचं काहीतरी चुकलंय, म्हणून सगळ्यांचाच हिशोब करूया चुकता, बघा भाऊचा धक्का न चुकता... "

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात दोन्ही टीममध्ये तुफान राडे पाहायला मिळाले. टीममध्ये झालेली स्पर्धकांची मैत्री, प्रेम यामुळे बिग बॉसच्या घरातील संपूर्ण वातावरण बिघडलं. यामुळेच बिग बॉसच्या घरात झालेली वस्तूंची तोडफोड या सर्वांचा हिशोब रितेश देशमुख आज भाऊच्या धक्क्यावर घेणार आहे.

या आठवड्यात निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीचा वाद, अरबाजने केलेली भांड्याची आदळाआपट, सोन्याची नाणी शोधण्याचा टास्क यामुळे स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. आता भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस रितेश देशमुख नक्की कोणाचा हिशोब घेणार? हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT