Arbaz Patel video
मनोरंजन बातम्या

Arbaz Patel: सिंगल की कमिटेड? अरबाजने रिलेशनशिपबद्दल केला मोठा खुलासा, Video Viral

Arbaz Patel Viral Video: बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अरबाज त्याच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा करताना दिसतोय.

Saam Tv

सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीची चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरुवाती पासूनच राडे, भांडण आणि आरडाओरड पाहायला मिळाली आहे. दररोज घरातील सदस्यांसाठी टास्क दरम्यान काही ना काही नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजची जोडी पहिल्याच दिवसापासून चर्चेत होती. त्यांच्यामधील प्रेम, मैत्रीमुळ दोघे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते. त्या दरम्यान लिझा बिंद्राने तिच्या सोशल मीडियावर तिचा आणि अरबाजचा साखरपुडा झालाय असा दावा करत होती. त्यादरम्यान प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.

लिझा बिंद्रा आणि अरबाज खरचं रिलेशन शिपमध्ये आहेत का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आला. त्यानंतर जेव्हा निक्कीची आई बिग बॉसच्या घरामध्ये आली त्यावेळी त्यांनी निक्कीला सांगितले की, "अरबाजने खुप चुकिचं केलं आहे. त्याचा साखरपुडा झाला आहे." त्यावर निक्की म्हणते की, "मला माहिती न्हवत अरबाजचा साखरपुडा झालाय. त्याने अनेकवेळा सांगितलं की तो कमिटेड आहे."

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर अरबाजला देखील अनेकदा त्याच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर अनेकदा त्याने नकार दिला. सध्या अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अरबाजने त्याच्या रिलेशनशिपबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. व्हिडिओमध्ये अबजला त्याच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर उत्तर देत अरबाज म्हणाला की, "मलाच माहिती न्हवतं की माझा साखरपुडा झाला आहे. मी एका एपिसोडमध्ये म्हणालो होतो की मी कमिटेड आहे तुम्ही पाहिलचं असेल. परंतु माझा साखरपुडा वगैरे झालेला नाही आहे. माझे असे काही फोटो देखील नाही आहे ज्यामध्ये माझा साखरपुडा झाला आहे असं दिसेल. बिग बॉसमध्ये असताना मी म्हणालो होतो की मी कमीटेड आहे मात्र तिथून बाहेर आल्यावर काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मला हर्ट झालं आहे. म्हणून आता मी रिलेशनशिपमध्ये सुद्धा नाही आहे आणि कमिटेड सुद्धा नाही आहे."

त्यानंतर अरबाज म्हणाला, "आता सगळं काही संपल आहे. निक्की आणि माझी मैत्री अशीच कायम राहाणार आहे. निक्की प्रोमोमध्ये जसं रिअ‍ॅक्ट करतांना दिसतेय आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर काय होईल माहिती नाही. पण तिची यामध्ये काही चुक नाही आहे तिच्या आईला देखील खात्री न्हवती कोणत्या गोष्टीबद्दल पण मी तिला समजवण्याचा प्रयत्न करेन." अरबाज बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यापासून निक्कीच्या समर्थासाठी पोस्ट आणि प्रेक्षकांना अपिल करत आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT