Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Arbaz-Nikki : बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीची पुन्हा भेट झाली आहे. ती दोघही आपल्या नात्यावर बोलताना पाहायला मिळत आहेत.

Shreya Maskar

बिग बॉस मराठीचं 5 (Bigg Boss Marathi) पर्व खूप गाजत आहे. पहिल्या दिवसापासून निक्की आणि अरबाजची जोडी पाहायला मिळत आहे. त्यांनी घरात खूप राडा घातला आहे. तसेच घरात त्यांची मैत्री देखील चांगलीच झाली. अरबाज घराबाहेर गेल्यावर निक्कीला खूप दुःख झालेले पाहायला मिळाले. ती अरबाजच्या आठवणीत रडायची. बिग बॉसच्या घरात रियुनियनच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य पुन्हा घरात एकत्र आले. त्यामुळे अरबाज आणि निक्कीची पुन्हा भेट झाली. निक्कीला पाहून अरबाज खूप भावूक झाला.

अरबाज ( Arbaz Patel ) निक्कीला बोलतो की, "तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अगं माझा साखरपुडा नाही झाला आहे." यावर निक्की (Nikki Tamboli ) अरबाजला म्हणते की, मला डीपी दादा म्हणाले की दुबईला त्याची गर्लफ्रेंड आहे. तिला मराठी समजत नाही. याबद्दल जान्हवी देखील मला बोली होती. माझे आई-बाबा देखील माझ्यावर नाराज झाले. मला पुरुषोत्तम दादा म्हणाले की तू 10 दिवसांपासून नीट जेवला नाहीस"

यावर उत्तर देत अरबाज म्हणाला की, मी तुला घरात असताना बोलो होतो की मी 'कमिटेड' आहे. पण आता जे काही होत ते मी बाहेर जाऊन संपवलेलं आहे. सर्व माझ्या बद्दल अफवा पसरल्या आहेत. माझे अफेअर्स नाही आहेत. मी घरातून बाहेर जाताना देखील सर्वांना सांगितलं की तुझी काळजी घ्या. मी तुझी बाहेर खूप वाट बघतोय. मी फेक नाही आहे. असे बोलून अरबाज आपली बाजू निक्की समोर मांडतो. आता निक्की आणि अरबाजच्या नात्याचं पुढ काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

आज (6 ऑक्टोबर) बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी याकडे लागले आहे. फिनालेला निक्की, जान्हवी, अंकिता, सूरज, अभिजीत आणि धनंजय दादा गेले आहेत. आता यांच्यामध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी शर्यत पाहायला मिळणार आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी फुल्ल सपोर्ट करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decisions : राज्य सरकारचा मोठा निर्णय; भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकऱ्यांना दिलासा, या योजनेला ३ वर्षे मुदतवाढ

Maharashtra News Live Update: तिलारी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे घोटगे-परमे पूल पाण्याखाली

Skin Care: महागडे टोनर नको! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी तयार करा गुलाबपाणी; त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो

काँग्रेस प्रसिद्धीसाठी खालच्या स्तरावर उतरलीय; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

Dark Underarms: अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय करताय? डॉक्टरांनी सांगितल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT