Apurva Nemlekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4 Runner Up: अपुर्वाचा विजेतापद हुकल्यानंतरची खास पोस्ट, म्हणते 'प्रवास संपला तरीही...'

लेडी ऑफ वर्ड' अपूर्वा नेमळेकरने तिच्या बिग बॉसमधील प्रवासानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Apurva Nemlekar Viral Post: १०० दिवस प्रेक्षांचे मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ४' चा अंतिम सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. अक्षय केळकर 'बिग बॉस मराठी ४'चा विजेता ठरला. पण अपूर्वा नेमळेकर विजेती होणार असे अनेकांना वाटत होते. 'लेडी ऑफ वर्ड' अपूर्वा नेमळेकरने तिच्या बिग बॉसमधील प्रवासानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. चला पाहूया काय म्हणाली आहे अपूर्वा या पोस्टमध्ये.

अपूर्वा नेहमीच सर्वत्र परखड स्वभाव आणि दमदाक आवाजामुळे मराठी चित्रपटसृष्टीसह चर्चेत आली आहे. बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यामुळे तिने प्रत्येक स्पर्धकांसोबत पंगा घेतला होता. 'माझ्याशी नीट बोलायचं', 'जो नडला तो खपला' या तिच्या स्वभावापायी काही स्पर्धकांनी तिच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास आपण पाहिला आहे. जितकी अपुर्वा बोलण्यासाठी स्पष्ट आहे, त्याहून अधिक ती मनाने हळवी आहे. घरातल्या प्रत्येक स्पर्धकासोबत तिने आपले नाते घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केला.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर अपूर्वा एक पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने तिच्या सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. 'प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही, अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार! हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे... अपूर्व नेमळेकर' अशी पोस्ट तिने केली आहे.

'बिग बॉस मराठी ४'ची अपूर्वाला 'पिअर्स ग्लो लेडी' ठरली आहे. अपूर्वासह किरण माने, राखी सावंत, अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे टॉप ५ मध्ये होते. अपूर्व आणि अक्षय बिग बॉसच्या घरातील लाईट बंद करणारे शेवटचे दोन स्पर्धक होते. अपूर्वा बिग बॉसच्या फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक ठरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Live News Update: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT