Bigg Boss Marathi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरातून पुण्याच्या टॉकरवडीची एक्झिट, चावडीनंतर खेळात कोणते नवे बदल होणार?

एका स्पर्धकाला शनिवारी घराबाहेर जावे लागले होते, पण कालच्या एका स्पर्धकाच्या जाण्याने संपूर्ण घरालाच फार मोठा धक्का बसला होता.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: गेल्या २ ऑक्टोबरपासून सुरु झालेला 'बिग बॉस मराठी' चा खेळ संपायला आता अवघे काही दिवसच बाकी आहेत. गेल्या आठवड्यात घरात एकूण स्पर्धक ९ होते. त्यातील दोन घरातील स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. त्यातील एका स्पर्धकाला शनिवारी घराबाहेर जावे लागले होते, पण कालच्या एका स्पर्धकाच्या जाण्याने संपूर्ण घरालाच फार मोठा धक्का बसला होता.

काल झालेल्या बिग बॉसच्या चावडीवर सर्वांचेच लक्ष होते. कालच्या चावडीवर मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांना 'एकच फाईट वातावरण टाईट' हा टास्क दिला होता. ज्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने आपल्याला नं आवडत्या तीन स्पर्धकांचे नाव घेत आणि त्यातील नावडती गोष्ट सांगत फाईट मारायची होती. यामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी अमृता देशमुखचे नाव घेतले होते.

बिग बॉसच्या घरातून विकास सावंत शनिवारी बाहेर पडल्यानंतर आता अमृता देशमुखचाही प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्याने अमृताला खेळातून एक्झिट घ्यावी लागली आहे. पहिल्या काही दिवसांमध्ये अमृताचा घरातील वावर फार कमी होता. परंतु, नंतर तिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्या खेळात बदल करुन खेळताना दिसली.

विकास आणि अमृता देशमुखच्या एक्झिटनंतर घरातील प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक चाल लक्षपुर्वक खेळावी लागणार आहे. आपल्या समोरच्या स्पर्धकाचा डावपेच लक्षात घेऊनच खेळात बदल करावा लागणार आहे. अमृता देशमुख टेलिव्हिजन वरील एक लोकप्रिय अभिनेत्री असून आर. जे (Radio Jockey) देखील आहे. तिला पुण्याची टॉकरवडी म्हणून संबोधले जाते. ‘फ्रेशर्स’ या शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली असून मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT