Rakhi Sawant and Aroh Velankar had fight  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरामध्ये वादांची मालिका सुरूच, 'फालतू बाई...' आरोहाच्या या बोलण्याने राखी सावंतचा उद्रेक

आरोह आणि अपूर्वा यांच्या भांडणात राखीने उडी घेतली आहे.

Pooja Dange

Bigg Boss Marathi 4 Latest Update: 'बिग बॉस मराठी 4'चे आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. बिग बॉस मराठीचा खेळ नवीन स्पर्धकांच्या येण्याने अधिकच रंगत झाला आहे. बॉग बॉसच्या घरामध्ये नेहमीच आपण नवीन ट्विस्ट पाहतो. कधी नवीन स्पर्धकांच्या विरोध जुने स्पर्धक एकत्र येतात. तर कधी नवीन स्पर्धक जुन्या स्पर्धकांना खंबीर साथ देतात. असाच काहीसं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरातील हा आठवडा स्पेशल होता. या आठड्यात वेळ या थीमवर टास्क घेण्यात आले. टास्कने काहींना वाचवले तर काही शिकार झाले. 'बिग बॉस मराठीचे शेवटचे काही दिवस असल्याने या आठवल्यात सर्व स्पर्धकांचे कुटुंबीय स्पर्धकांना भेटायला आहे. सर्व स्पर्धकांना बिग बॉसच्या म्हणण्याप्रमाणे वेळ थांबली आहे असे वाटले. स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी कोण कसं खेळताय हे तर सांगितलंच तसेच पुढे खेळण्यासाठी नवी उमेद देखील दिली. (Bigg Boss Marathi)

बिग बॉस आजच्या भागात काय होणार याची सर्व स्पर्धकांना उत्सुकता आहे. कारण सर्व कुटुंबीयांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केलं होते. त्यामुळे सर्व स्पर्धकांमध्ये एक ऋणानुबंध दिसून आले होते. परंतु आजच्या भागात सर्वच फासे फिरले असे दिसत आहे.

आजच्या भागात आरोह आणि अपूर्वा यांची शाब्दिक भांडणे होत असतात. त्यात आरोह अपूर्वाला म्हणतो, कोण समजतेस स्वतःला तू नेमळेकर? त्यावर अपूर्व त्याला म्हणते, तू कोण आहेस ते बघ आधी? तू काय मला सांगतोस? त्यावर आरोह तिला 'चल चल निघ' असे म्हणतो. 'स्वतः काय म्हणतो हाडतूडची भाषा करतो' असे अपूर्वा त्याला सुनावते. फालतू बाई, मुर्ख बाई आहेस तू एक नंबरची, असे आरोह तिला बोलतो. आरोहचे हे बोलणे ऐकून राखीला राग येतो आणि ती आरोहाच्या तोंडावर पाणी फेकते. तसेच राखी त्याला म्हणते, 'फालतू बाई कधीच म्हणायचे नाही.' (Drama)

आरोह आणि अपूर्वा यांच्यात होत असलेल्या भांडणात राखीने उडी घेतली आहे. आरोहाला चुकीचे ठरविण्यासाठी कोणते स्पर्धक या भांडणात आपली पोळी शेकून घेणार हे आपल्याला आजच्या भागात कळेलच. पण अपूर्वाच्या बाजूने राखी उभी राहिली यामुळे या दोघींचे नाते चांगले होईल का? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT