Amruta Dhongade Instagram @amrutadhongade_official
मनोरंजन बातम्या

Amruta Dhongade: अमृता धोंगडेची घरातून बाहेर पडताच भावूक पोस्ट, '...पण स्वप्न अर्धवटच राहिलं'

अमृताला शेवटच्या क्षणी काही मत कमी पडल्याने तिला घराबाहेर जावे लागले. सहाजिकच तिच्या जाण्याने चाहत्यांना बराच मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.

Chetan Bodke

Amruta Dhongade: काल बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा ग्रँड फिनाले मोठ्या थाटा माटात संपन्न झाला. या फिनालेला एकूण पाच स्पर्धक होते. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे कोल्हापूर की बिजली अमृता धोंगडे. अमृताला शेवटच्या क्षणी काही मत कमी पडल्याने तिला घराबाहेर जावे लागले. सहाजिकच तिच्या जाण्याने चाहत्यांना बराच मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.

अमृताने ग्रँड फिनालेत टॉप ४ मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर आणि किरण माने हे स्पर्धक टॉप ४ मध्ये होते. नेहमीच कोल्हापूरच्या कडाडणाऱ्या बिजलीने पहिल्या दिवसापासूनच आपला गावरान ठसकेबाजपणा दाखवायला सुरुवात केली होती.

टास्कदरम्यानही अमृता ‘बिग बॉस’च्या घरात आक्रमक झालेली पाहायला मिळाली. अमृताचा घरातील वावर व उत्तम खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. परंतु, बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचं तिचं स्वप्न अर्धवटच राहिलं.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अमृताने तिच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टद्वारे अमृता म्हणते, “महाराष्ट्राच्या मिरचीकडून तुम्हा सर्वाचे खूप आभार. या प्रेमासाठी तुमची अमू कायम ऋणी राहील.

वर्च्युअल भेट तर गेले १०० दिवस होतच होती. पण आता प्रत्यक्षात लवकरच भेटुया. प्रेम कायम ठेवा. ‘जाळ अन् धूर संगटच’…” असे ती आपल्या पोस्ट मध्ये म्हणाली असून तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

अमृता एक अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT