Jay Dudhane saam tv
मनोरंजन बातम्या

Jay Dudhane : 'बिग बॉस' फेम अभिनेत्याच्या घरी लगीनघाई; गर्लफ्रेंडसोबत पार पडला साखरपुडा, क्यूट VIDEO होतोय व्हायरल

Jay Dudhane Engagement : सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. नुकताच जय दुधाणेचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे.

Shreya Maskar

अभिनेता जय दुधाणेला 'बिग बॉस मराठी'मधून खूप लोकप्रियता मिळाली.

जय दुधाणेने नुकताच गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे.

जय दुधाणेची गर्लफ्रेंड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता जय दुधाणे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच जयने आपल्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जय दुधाणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ही दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

जय दुधाणेच्या साखरपुड्याचा एक खास रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात जय हर्षलाला रोमँटिक अंदाजात गुडघ्यावर बसून साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे.जय दुधाणेच्या साखरपुड्याला त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबिय पाहायला मिळाले. खूप थाटामाटात साखरपुडा पार पडला. सध्या जय दुधाणे आणि हर्षला पाटील यांच्यावर चाहते, मित्रमंडळी , कलाकार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मार्च महिन्यात जयने मसुरी येथे निसर्गाच्या सानिध्यात गुडघ्यावर बसून हर्षला प्रपोज केले होते आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. जय दुधाणेने साखरपुड्यासाठी काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. तर हर्षलाने लेहंगा परिधान केला आहे. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत आहे. चाहते आता दोघांची लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

वर्कफ्रंट

जय दुधाणेने अनेक रिअ‍ॅलिटी शो मध्ये भाग घेतला आहे. तो 'बिग बॉस मराठी 3' मध्ये झळकला. तसेच जय दुधाणे Splitsvilla 13 चा विजेता देखील ठरला आहे. तर 'बिग बॉस मराठी 3' तो उपविजेता ठरला. तसेच त्याने 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम केले आहे. चाहते आता त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT