bigg boss season 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 16 : साजिद खान येताच बऱ्याच महिला स्पर्धकांनी घराला ठोकला रामराम; नेमके काय आहे कारण?

बिग बॉस हिंदीचा स्पर्धक साजिद खानची एन्ट्री होताच सर्वच खेळाडूंच्या रागाचा पारा वाढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बॉस हिंदी (Bigg Boss) नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो. बऱ्याचदा हिंदी बिग बॉसच्या घरात कोणत्याही कारणांवरून स्पर्धकांमध्ये वादाचे खटके उडत असतात. नुकतेच बिग बॉस हिंदीचे १६ वे पर्व सुरू झाले आहे. तब्बल १५ पर्वांमधे अनेक विषयांवरून किंवा शुल्लक कारणांमुळे स्पर्धकांमध्ये हमरी- तूमरी रंगलेली सर्वांनी पाहिली. पुन्हा एकदा बिग बॉस हिंदीच्या घरातील एका स्पर्धकामुळे वाद निर्माण झाला आहे. तो स्पर्धक आहे बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान. त्याने स्पर्धक म्हणून एन्ट्री करताच सर्वांच्याच रागाचा पारा वाढला आहे. (Bollywood)

स्पर्धकांच्या रोषाचे कारण म्हणजे, चित्रपटसृष्टीतील महिलांवर अत्याचार झाला त्या रोषातून मीटू प्रकरणाला तोंड फुटले. त्या प्रकरणात बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांची आणि दिग्दर्शकांची नावे समोर आले होते. त्यात दिग्दर्शक साजिद खानचेही नाव होते. त्याने महिलांवर शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर केला जात होता. महिलांवर शोषण करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या साजिद खानवर सर्व स्पर्धक चांगलेच चिडले आहेत.

त्याला या रिअॅलिटी शो मधून काढण्याची मागणी स्पर्धक करित आहेत. साजिद खानला घराच्या बाहेर काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालिवाल ही करीत आहे. महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्रातून साजिद खानला बिग बॉसच्या घरामधून काढण्याची मागणी केली आहे. साजिद खानवर तब्बल १० महिलांनी 'MeToo'चा आरोप लावला आहे.

याविषयावर महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले की, 'MeToo चळवळीदरम्यान साजिद खानवर 10 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवते. अशा व्यक्तीला बिग बॉसच्या घरात स्थान देणे चुकीचे आहे. साजिद खानला या शोमधून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पत्राद्वारे मागणीही केली आहे.'

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे बिग बॉस स्पर्धक साजिद खानला घराबाहेर काढण्याची मागणी महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केली आहे. हे मागणी करणारे पत्र त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी साजिद खानवर महिलांनी लावलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल उल्लेख केला आहे. साजिद खानला बिग बॉसच्या घरात पाहून उर्फी जावेदनेही संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मंदाना करिमी हिने साजिद खानची बिग बॉसच्या घरात झालेली एन्ट्री पाहून बॉलिवूडला रामराम ठोकला. मंदाना करिमीने साजिद खानवर मीटू मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं

Free Bus Travel : सरकारची मोठी घोषणा! 'या' महिलांना करता येणार मोफत प्रवास; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

SCROLL FOR NEXT