Armaan Malik Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

Bigg Boss Fame Armaan Malik Accident : प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस फेम अरमान मलिक याचा अपघात झाला आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस फेम अरमान मलिकचा अपघात झाला आहे. कामानिमित्त बाहेर असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर स्वत:अरमानने याबद्दल सांगितलं आहे. एका गंभीर अपघातातून संपूर्ण कुटुंब वाचलं असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

अरमान मलिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये अरमान म्हणतोय, 'आठवडाभरापूर्वी मी या कारची तक्रार केली होती. आज आम्ही मनालीहून गाण्याचे शुटिंग करुन घरी परतत होतो. अचानक कारचा टायर फुटला आणि कार अस्थिर झाली. आम्ही मृत्यूच्या दारेतून परत आलोय.'

पुढे त्याने, 'मी कारमध्ये झोपेलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागे होती. आमच्यासोबत घडलेल्या घटनेत आम्ही बचावलो ही देवाची कृपा आहे.' असं त्यानं म्हटलं आहे.कारसोबतचा व्हिडिओ शेअर करत अरमानने कॅप्शनमध्ये,'आज आम्ही मृत्यूपासून वाचलो आहोत. असं लिहलं आहे.

अरमानने हा संपूर्ण प्रकार सांगितला आहे. अपघाताच्यावेळी अरमान देखील कारमध्ये होता. गाण्याच्या शुटींगनिमित्त तो मनालीला गेला होता. दरम्याने तेथून येताना ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच अरमानने कारची तक्रार केली होती. अरमानने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याचे चाहते कमेंट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

Monsoon Health Care: पावसाळ्यात रात्री झोपल्यावर कानात घोण शिरला तर? घाबरु नका 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT