Prasad- Amruta Romantic Dance Instagram
मनोरंजन बातम्या

Prasad- Amruta Romantic Dance: प्रसाद- अमृताने मेहेंदीमध्ये धरला जबरदस्त ठेका, रोमँटिक स्टेप्सने वेधले मन

Prasad- Amruta Mehendi Function: सध्या सोशल मीडियावर प्रसाद- अमृताच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Prasad- Amruta Romantic Dance

बिग बॉस मराठी फेम प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या केळवणाची प्रचंड चर्चा आहेत. आज अर्थात १८ नोव्हेंबर रोजी ही जोडी पुण्यात लग्नगाठ बांधणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर या जोडीच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. ‘राजश्री मराठी’ या मनोरंजन युट्यूब चॅनलने त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच काल सायंकाळी प्रसाद- अमृताच्या मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फक्त त्या दोघांनीच नाही तर त्यांच्या मित्रपरिवाराने आणि परिवारातील काही सदस्यांनी सुद्धा अप्रतिम कलाकृती सादर करत कार्यक्रमाला चारचाँद लावले. कार्यक्रमामध्ये दोघांनीही अफलातून रोमँटिक डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधले. कार्यक्रमामध्ये प्रसाद- अमृताने अनेक वेगवेगळ्या गाण्यांवर रोमँटिक डान्स केलेला पाहायला मिळाला. त्यांच्या मित्रमंडळींसह परिवारातील सदस्यांसोबतही त्या दोघांनी ठेका धरला.

मेहेंदीच्या कार्यक्रमामध्ये प्रसादने काळया रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. त्यावर काळया रंगाचा कोट परिधान केला होता. तर अमृताने ऑफ व्हाईट रंगाचा घागरा परिधान केला होता. त्यावर त्याला साजेसा मेकअप सुद्धा तिने केला होता. तिच्या ड्रेसवर सुंदर आणि बारीक नक्षीकाम सुद्धा केलेला दिसत आहे. यावेळी प्रसाद- अमृताने अनेक रोमँटिक गाण्यावर ठेका धरलेला दिसला. त्यांचा रोमँटिक डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (Marathi Film)

रश्मी अनपट, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ खिरीड, ओमकार राऊत, नम्रता संभेरावसह अनेक कलाकरांनी अमृता- प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली आहे. यावेळी अमृता- प्रसादच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर प्रसाद- अमृताच्या मैत्रीची चर्चा झाली होती. दोघांनीही जुलै महिन्यामध्ये आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने पार पाडला होता. त्यासोबतच अनेकदा प्रसाद- अमृताच्या केळवणाची सुद्धा चांगलीच चर्चा रंगली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Corporation Election: युती झाली पण लढाई सोप्पी नाही; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपचा प्लान काय?

January Bank Holiday: जानेवारीत बँकात १६ दिवस राहणार बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Zodiac signs: आज योग्य निर्णय घेतलात तर पुढचं वर्ष बदलेल! २५ डिसेंबरला ‘या’ राशी ठरणार लकी

Skin Care : न्यू ईअर पार्टीसाठी स्कीन ग्लोइंग हवीये? मग हे टॉप फाईव्ह फेसपॅक नक्कीच ट्राय करा

SCROLL FOR NEXT