Bigg Boss 16 Fianle Saam Tv
मनोरंजन बातम्या

MC Stan: 'शिव ठाकरेच ट्रॉफीचा दावेदार होता, पण...', MC स्टॅनची विजयानंतर केलेलं वक्तव्य चर्चेत

'बिग बॉस १६'ची ट्रॉफी MC स्टॅन जिंकला असून तो त्या ट्रॉफीवर समाधानी नसल्याचे कळत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Fame Shiv Thakare And MC Stan: 'बिग बॉस १६'चा ग्रँड फिनाले काल मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. काल कार्यक्रमाची सुरुवात मराठमोळ्या वादनाने अर्थात ढोल ताशाच्या गजरात झाली. यावेळी सर्वच स्पर्धकांनी एकत्र येत परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाला चार चॉंद लावले. टॉप ५ मध्ये शिव ठाकरे, MC स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, शालिन भनौत, अर्चना गौतम हे स्पर्धक होते. 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी MC स्टॅन जिंकला असून तो त्या ट्रॉफीवर समाधानी नसल्याचे कळत आहे.

काल 'बिग बॉस'च्या सोळाव्या सीझनचा विजेता MC स्टॅन झाला आहे, पण पहिल्या दिवसापासून शिव ठाकरेच्या नावाचीच विजेता म्हणून चर्चा जोरात होती. MC स्टॅनची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर त्याने लगेचच माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्याला शिव ठाकरे संबंधित काही प्रश्न विचारले होते.

त्यावेळी स्टॅन म्हणला, "मी आणि शिव नुकतंच काही विषयांवर चर्चा करत होतो. त्यावेळी आमच्या दोघांचं ट्रॉफी कोण जिंकणार यावर चर्चा सुरु होती. त्यावेळी आम्ही दोघांनीही एकमेकांना फार समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनीही एकमेकांना समर्थन दिले होते. नेहमीच शिव माझ्यासोबत सकारात्मक पद्धतीनेच बोलण्याचा प्रयत्न करायचा."

यावेळी स्टॅनला शिवबद्दल काय वाटते असाही प्रश्न विचारला होता. दरम्यान स्टॅन म्हणला, "शिव रनर अप ठरला असल्याने मला फारच दु:ख होत आहे. कदाचित हा शो देहबोलीवर (Personality) सर्वाधिक आधारित शो होता. खूपच वेगळ्या पद्धतीने हा शो सर्वच स्पर्धक खेळले होते. शिवसुद्धा खुप चांगल्या पद्धतीने सर्व खेळ खेळला होता. शिवलाच ही ट्रॉफी मिळायला हवी होती. कारण शिव त्या ट्रॉफीसाठी पात्र (Deserv) होता. पण आमच्यात मतांच्या संख्येत फारच तफावत असल्याने त्याची ती ट्रॉफी हुकली."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT