Sreejita De  SAAM TV
मनोरंजन बातम्या

बाई काय हा प्रकार! Bigg Boss फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्नबंधनात, वर्षभरातच दुसरं लग्न

Sreejita De Wedding Photo : बिग बॉस फेम श्रीजिता डे हिने पुन्हा आपल्या बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी लग्नगाठ बांधली आहे. पाहा फोटो

Shreya Maskar

Entertainment News: 'बिग बॉस 16' फेम श्रीजिता डे (Sreejita De) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. टिव्ही अभिनेत्री श्रीजिता डे पती ब्लोम-पेपसोबत (Michael Blohm Pape) १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. आता तिने बंगाली पद्धतीने लग्न केलं आहे.

'बिग बॉस 16' फेम श्रीजिता डे पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड ब्लोम-पेपशी लग्न केलं आहे. श्रीजिता डेने आपल्या मेंहदी आणि हळदी समारंभाचे सुंदर फोटो शेअर केलं आहेत. त्यांचा हा सोहळा गोव्यात पार पडला.

श्रीजिता डे ने हळदीसाठी व्हाईट पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर पिवळ्या रंगाची ओढणी आहे. कलरफूल ओढणी लेहंग्याची सुंदरता वाढवत आहे. तर ब्लोम-पेपने व्हाईट पेस्टल रंगाचाच शेरवानी परिधान केली आहे. श्रीजिता तिच्या हळदी सोहळ्याला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "दिल से दिल तक… प्रेमाचा आणि आनंदाचा रंग !"

श्रीजिताने मेहंदीसाठी इंडो-वेस्टर्न लूक केला होता. गोल्डन ब्लाउज आणि ड्रेप स्कर्ट परिधान केला होता. श्रीजिताने मेहंदी सोहळ्याच्या फोटोला खास कॅप्शन दिलं आहे. " तिने लिहिलं की, "एक कथा जी आमची मुले त्यांच्या मुलांना सांगतील... प्रेमाची, एकत्रतेची आणि या जगाच्या पलीकडची!"

श्रीजिताच्या लग्नाला तिच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली आहे. तसेच अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीजिता डे आणि ब्लोम-पेप सोबत याआधी देखील ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. तेव्हा त्यांचे आठ महिन्यांनी लग्नाचं रिसेप्शन देखील झाले होते. २०१९ पासून श्रीजिता आणि मायकल एकमेकांना डेट करत होते. मायकलने श्रीजिताला पॅरिसमध्ये असताना आपल प्रेम व्यक्त केलं होते. तिला प्रपोज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT