CID saam tv
मनोरंजन बातम्या

CID मध्ये डेडबॉडीची भूमिका साकारण्यासाठी किती रुपये मिळायचे? बिग बॉस फेम अभिनेत्रीने केला खुलासा

Payment For Dead Body Role In CID : सीआयडीमध्ये मृतदेहाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला किती रुपयांचे मानधन मिळायचे, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सीआयडी लोकप्रिय कार्यक्रम आहे

प्रसिद्ध अभिनेत्रीने सीआयडीमध्ये मृतदेहाची भूमिका साकारली

मृतदेहाच्या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनाचा अभिनेत्रीने खुलासा केला

'बिग बॉस'मुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळते. 'बिग बॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतम अलिकडेच राजीव खंडेलवाल होस्ट करत असलेल्या 'तुम हो ना' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली. त्यात तिने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. यात तिने 'सीआयडी' बद्दलची आठवण सांगितली.

अभिनेत्री अर्चना गौतमने एकेकाळी 'सीआयडी' या गाजलेल्या मालिकेत मृतदेहाची भूमिका साकारली होती. ज्यासाठी तिला ३ हजार रुपयांचे मानधन मिळले होते. ती म्हणाली की, "लोकांना अनेकदा वाटते की या इंडस्ट्रीमध्ये सर्व काही खूप सोपे आहे, रातोरात काम मिळते. पण हे खरे नाही. खरं तर, मी केलेल्या खऱ्या संघर्षाबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. माझी तिसरी टेलिव्हिजन मालिका 'सीआयडी' होती, ज्यात मी एका मृतदेहाची भूमिका साकारली होती आणि मला दिवसाला ३,००० रुपये मिळायचे."

पुढे अभिनेत्री म्हणाली की, "मी तिथे निष्प्राण असल्याचा अभिनय करत पडून असताना सेटवरचे ज्येष्ठ कलाकार माझे डोळे तपासत होते, हे मला अजूनही आठवते. मला मृतदेहाची भूमिका साकारण्याची सवय नव्हती, त्यामुळे तो एक वेगळाच अनुभव होता. आता मागे वळून पाहताना मला वाटते की, आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यापूर्वी अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये अनेक छोट्या भूमिका साकारून केलेली खूप मेहनत कारणीभूत आहे."

अर्चना गौतमने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती सलमान खानच्या 'बिग बॉस १६' ची सदस्य राहीली आहे. तसेच ती 'खतरों के खिलाडी १३' मध्ये ही दिसली. अर्चना गौतम सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monsoon Tourism: स्वित्झर्लंडलाही टक्कर देणारी मुंबईजवळची ही 4 ठिकाणं; पावसाळ्यात सौंदर्य होतं दुप्पट

Maharashtra News Live Update: नागपुरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळा

Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

Cloud Formation : आकाशातील ढग नेमके तयार कसे होतात? जाणून घ्या या मागचं भन्नाट वैज्ञानिक कारण

Saturday Horoscope: डोकं शांत ठेवा, ५ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT