Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: विकेंड का वारमध्ये सलमान खानसमोर स्काउटओपीचा मोठा खुलासा; काश्वी हिरानंदानीसोबत केली एंगेजमेंट

Bigg Boss 20: बिग बॉस २० मध्ये स्काउटओपीने काश्वी हिरानंदानी आपली फियॉन्से असल्याचा खुलासा केला. लवप्रीतसोबतच्या नात्यावर सलमान खानने प्रश्न विचारल्यानंतर घरात चर्चांना उधाण आले.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस २०' सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील वाद, प्रेमाचे समीकरण आणि सलमान खानचा विकेंड वार यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'वीकेंड का वार' भागात सलमान खानने अभिनेत्री कनिका मानला तिच्या वागण्यावरून चांगलेच सुनावले. काझी तौकीर आणि आम्रपाली दुबे यांच्यासोबत झालेल्या वादावरून तिला प्रश्न विचारण्यात आले. मात्र, या भागात सर्वाधिक चर्चा झाली ती गेमर स्काउटओपी म्हणजेच तन्मय सिंग याच्या वैयक्तिक आयुष्याची. स्काउटने आपल्या एंगेजमेंटबाबत मोठा खुलासा केला असून, त्याच होणारी बायके काश्वी हिरानंदानी असल्याचे सांगितले आहे.

लवप्रीतसोबतच्या नात्यावर सलमानने विचारले प्रश्न

'बिग बॉस २०'च्या घरात स्काउटओपी आणि लवप्रीत कौर गिल यांच्या मैत्रीची बरीच चर्चा होत आहे. नुकताच स्काउटने आपले केस काढले. यावेळी तो प्रचंड भावूक झाला आणि रडू लागला. त्यानंतर सलमान खानने त्याला लवप्रीतबद्दलच्या भावनांविषयी विचारले. स्काउटच्या मनात लवप्रीतबद्दल रोमँटिक भावना आहेत का, असा प्रश्न सलमानने उपस्थित केला. यावर स्काउटने स्पष्ट केले की, लवप्रीत ही त्याच्यासाठी केवळ एक स्पर्धक आहे.

स्काउटओपीची काश्वी हिरानंदानीसोबत एंगेजमेंट?

सलमान खानने स्काउटच्या तणावामागे घराबाहेरील काही गोष्टी असू शकतात, असे म्हटले. यावर स्काउटने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, काश्वी ही माझी होणारी बायको (फियॉन्से) आहे. आतापर्यंत मी याबद्दल कुठेही सार्वजनिकपणे सांगितले नव्हते. माझ्या कोणत्याही कृतीमुळे काश्वीला थोडासाही त्रास झाला, तर मला अपराधी असल्याचे वाटते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून काश्वीने माझ्यासाठी खूप काही केले आहे. आपल्या चुका सुधारण्याच्या आणि इतरांना काहीतरी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात मानसिक ताण वाढत असल्याचेही त्याने सांगितले.

सलमानने स्काउटच्या हेअरकटची उडवली खिल्ली

स्काउटने केस कापण्याच्या निर्णयावर सलमान खानने मिश्किल टिप्पणी केली. तू 'तेरे नाम' चित्रपटातील पात्रासारखा दिसण्याचा प्रयत्न का करत आहेस? असा प्रश्न त्याने विचारला. यावर स्काउटने मी स्ट्रीमिंग करत असताना देखील केस कापल्याचे सांगितले. सर्व घडल्याचे सांगितले. त्यानंतर सलमाननेही त्याच्या नातेसंबंधांवर मिश्किल टिप्पणी केली.

स्काउटच्या आईची भावनिक ऑडिओ नोट

दरम्यान, स्काउटच्या आईने सोशल मीडियावर ऑडिओ नोट शेअर करत चिंता व्यक्त केली. शोचे एडिट केलेले प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, असे तिने म्हटले. तसेच स्काउटने यापूर्वीही आपल्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिले असून, वारंवार त्याच विषयावर चर्चा होत असल्याचे तिने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: वाहतूक कोंडीची कटकट संपणार, अंधेरीवरून खारला करा मेट्रोने प्रवास; कधीपासून होणार सुरू?

Kitchen Vastu Tips: घरात कोणत्या दिशेला पाण्याचा नळ असावा? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

ZP Elections : जिल्हा परिषद-पंचायत समितीमधील SC/ST आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल, कोर्टात नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update: ऊस दरवाढीसाठी सोलापूरात स्वाभिमानीचा मोर्चा

महिलांसाठी नारायण पेठ पैठणी साडीच्या लेटेस्ट डिझाईन्स, ५ पॅटर्न्स नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT