Bigg Boss 20 AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar : 'बिग बॉस २०' सुरु होऊन आता पहिला आठवडा झाला आहे. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे पाहताना दिसत आहेत. घरात एक क्यूट कपल बनले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस २०' चा पहिला 'वीकेंड का वार' चांगलाच रंगला

'बिग बॉस २०' च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे

सलमान खानसमोर केला रोमँटिक कपल डान्स

सलमान खान होस्ट करत असलेला शो 'बिग बॉस २०' सुरु होऊन आता एक आठवडा झाला आहे. पहिल्याच आठवड्यात घरात तुफान राडा पाहायला मिळाला. नॉमिनेशन आणि कॅप्टन्सी टास्क दरम्यान भांडणे झाली. घरात प्रेमाची नाती देखील खुलताना दिसत आहे. भाईजानने देखील पहिल्याच 'वीकेंड का वार'मध्ये काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली तर काहींचे कौतुक केले.

सलमान खानने कनिका मान आणि गुल्लू यांचे कौतुक केले. 'बिग बॉस २०'च्या घरात हे नवीन कपल पाहायला मिळत आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन प्रोमो व्हिडीओमध्ये गुल्लू कनिकाला प्रपोज करताना दिसत आहे. तर दोघांनी रोमँटिक कपल डान्स देखील केला. प्रेक्षकही या जोडीला भरपूर प्रेम देत आहेत. सलमान खान गुल्लूला कनिकाला इंग्रजीमध्ये प्रपोज करण्यास सांगतो.

गुल्लू प्रपोज करत बोलतो की, "तू मला सुंदर वाटलीस...जर तुला चौधरी व्हायचे असेल, तर तुला खूप मेहनत करावी लागेल..." त्यावर कनिका म्हणाली, "मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करेन..." गुल्लूच्या या बोलण्याने सलमान आणि घरातील इतर सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. कनिका जिममध्ये कसा व्यायाम करते हे गुल्लूने सर्वांना अभिनय करून दाखवले. त्यानंतर त्या दोघांनी एक रोमँटिक डान्स केला. डान्स पाहून सलमान म्हणाला, "तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता..."

आता कनिका आणि गुल्लूची मैत्री बिग बॉसच्या घरात कशी वळण घेते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कनिका आणि गुल्लूच्या या व्हिडीओवर प्रेक्षक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. लोकांना ही जोडी खूपच आवडली आहे. काहींनी याला प्रेम तर काहींनी निखळ मैत्री बोलले आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना वेड लावत आहे. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

४ मुली, १ मुलगा अन् गेस्ट हाऊसमधला तो रूम...पोलिसांची अचानक धाड पडताच उडाली खळबळ; आक्षेपार्ह साहित्य जप्त

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

SCROLL FOR NEXT