Bigg Boss 20 Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 च्या घरात कॅप्टन्सीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा! 'या' स्पर्धकाने माही विजच्या हाताचा चावा घेतला |VIDEO

Bigg Boss 20 New Captain : 'बिग बॉस २०'च्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. लव गिल आणि माही विज यांच्यात टोकाचे भांडण झाले. घराचा नवा कॅप्टन कोण बनला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

कॅप्टन्सी टास्कमध्ये जोरदार भांडणे

घरातील १० सदस्य या आठवड्यात नॉमिनेट

लव गिलवर माही विजच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप

'बिग बॉस २०' चा खेळ दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. नुकताच घरात या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. यात स्पर्धकांमध्ये प्रचंड लढाई पाहायला मिळाली. स्पर्धकांमध्ये नियमितपणे वाद आणि भांडणे होतात, पण यावेळी कॅप्टनसी टास्कदरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टास्कदरम्यान लव गिल आणि अभिनेत्री माही विज यांच्यातील वाद इतका वाढतो की, लवने माहीच्या हाताला चावा घेतल्याचा आरोप माही लव गिलवर लावते. खेळातील या घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. व्हिडीओवरून आणि सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांवरून असे दिसून येते की, वादादरम्यान लव गिलला आपला राग अनावर होतो आणि ती माही विजच्या हाताला चावा घेतला. तथापि, दोघांमध्ये हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला याचे संपूर्ण तपशील अद्याप अस्पष्ट आहेत.

'बिग बॉस २०' च्या घरातील स्पर्धकांना टास्क दरम्यान त्यांच्या शक्तीचा वापर करण्याची परवानगी आहे, परंतु जाणूनबुजून शारीरिक इजा पोहोचवणे नियमांच्या विरुद्ध मानले जाते. परिणामी, लव गिलवरील या आरोपामुळे आता बिग बॉस कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अद्याप लव गिलवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. येणारा 'वीकेंड का वार' खूपच मनोरंजक ठरणार आहे.

'बिग बॉस २०' चा नवा कॅप्टन कोण?

BBTakच्या रिपोर्टनुसार, उदिती सिंग 'बिग बॉस २०' घराची नवीन कॅप्टन बनली आहे. मात्र अद्याप बिग बॉसने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी १० सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात अरिशफा खान, माही वीज, कनिका मान, लव्ह गिल, मनीष गोयल, आम्रपाली दुबे, गुल्लू, स्काऊट ओपी, काझी तौकीर आणि युंग डीएसए यांचा समावेश आहे. या आठवड्यात कोण घराचा निरोप घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक महापालिकेसमोर पाणीकपात लागू करण्याचे मोठे आव्हान

Igatpuri : साईबाबांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना! मुक्कामाच्या ठिकाणी निवारा शेड कोसळले, १७ साईभक्त जखमी

Haunted Fort : भारतातील सर्वात रहस्यमयी किल्ला! सूर्यास्तानंतर येथे जाण्यास मनाई, नाव ऐकताच थरकाप उडेल

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपमध्ये हालचालींना वेग, रात्री पार पडली मंत्र्यांची महत्वाची बैठक

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! १,५०० कोटींच्या उंबरठ्यावर, १३व्या दिवशी कमाईचा आकडा किती?

SCROLL FOR NEXT