Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : काझी तौकीरच्या एका कमेंटने मनीष गोयलचा संताप अनावर; घरात केला गोंधळ, नंतर ढसाढसा रडला

Bigg Boss 20 : बिग बॉस २० मध्ये काझी तौकीरच्या प्रोफेसर कमेंटमुळे मनीष गोयल संतापला. रागाच्या भरात त्याने टेबलावर हात मारला आणि स्वतःच्या अंगावर पाणी ओतून रडू लागला.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०' हा रिॲलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, भांडणं आणि नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच आता अभिनेता मनीष गोयल आणि काझी तौकीर यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काझीच्या एका कमेंटमुळे मनीष चांगलाच संतापला. त्याचा राग इतका वाढला की, त्याने घरातील टेबलावर हात मारण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर रागाच्या भरात त्याने स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेतले आणि त्यानंतर तो ढसाढसा रडू लागला. या घटनेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काझीच्या कमेंटमुळे मनीषचा पारा चढला

'बिग बॉस २०'चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान काझी तौकीर मनीष गोयलला नॉमिनेट करताना दिसत आहे. यावेळी काझी मनीषला चांगला माणूस म्हणतो. मात्र, तो एखाद्या प्रोफेसरसारखा दिसतो, अशी टिप्पणी करतो. काझीचे हे बोलणे मनीषला अजिबात आवडत नाही.मनीष या कमेंटवर संतापतो आणि आपण तो एक टीव्ही अभिनेता तसेच स्टार असल्याचे सांगू लागतो. तो वारंवार स्वतःचे नाव घेत आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे, काझीही त्याच्या बोलण्याला उत्तर देतो. मनीष प्रोफेसरसारखा दिसतो, असे म्हणण्यात चुकीचे काय आहे, असा प्रश्न तो विचारतो. यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढतो.

रागाच्या भरात मनीषने स्वतःच्या अंगावर ओतले पाणी

काझीसोबत सुरू असलेल्या वादामुळे मनीषचा राग अनावर होतो. तो वारंवार टेबलावर हात मारू लागतो. यामुळे टेबलावर ठेवलेला चष्माही खाली पडतो. त्यानंतर मनीष अचानक उठतो आणि स्वतःच्या अंगावर पाण्याचा ग्लास ओतून घेतो. काही क्षणांतच त्याला रडू कोसळते. रडत असताना मनीष काझीला म्हणतो, "एका चांगल्या माणसाला का सारखा छळतोयस? तू मला कधीच समजून घेतले नाहीस. मी तुला मनापासून मानले होते," असेही तो सांगतो. मनीषची ही अवस्था पाहून घरातील इतर स्पर्धक त्याला शांत करण्यासाठी आणि सांत्वन देण्यासाठी पुढे येतात.

आधीही दोघांमध्ये झाले होते वाद

शोच्या सुरुवातीला मनीष आणि काझी यांच्यात चांगली मैत्री होती. दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत होते. मात्र, काही वादांनंतर मनीषने काझीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. यापूर्वीही काझीने एका मुलीचा संदर्भ देत केलेल्या थट्टेमुळे मनीष भावुक झाला होता आणि त्याला रडू आले होते. आता पुन्हा एकदा दोघांमधील वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, आगामी एपिसोडमध्ये या वादाचे पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार? ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शिवसेनेचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, खासदार नरेश मस्केंना विश्वास

Maharashtra Politics: अमित शहांनी अजितदादाचं जगणं मुश्लिक केलं होतं, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Court Employees Strike: राज्यातील ३४००० दुय्यम न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; कोर्टाच्या कामकाजावर होणार परिणाम

Pillow Cleaning Tips: उशी स्वच्छ कशी करायची? ५ टिप्स महत्त्वाच्या

SCROLL FOR NEXT