Bigg Boss 20 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Bigg Boss 20 First Elimination : 'बिग बॉस २०' च्या घरात पहिला एलिमिनेशन टास्क पार पडला असून घरातील एकूण चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. कोण घराबाहेर जाणार पाहणे, मनोरंजक ठरणार आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात पार पडला पहिला एलिमिनेशन टास्क

पहिल्याच आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट

कॅप्टन्सी टास्कमध्येही झाला मोठा राडा

'बिग बॉस २०' मध्ये पहिल्या दिवसापासून तुफान राडा पाहायला मिळत आहे. रोज घरात नवीन भांडणे होत आहे. नुकताच घरात एलिमिनेशन आणि कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. आता शोचा पहिला 'वीकेंड का वार' येणार आहे आणि पहिल्या आठवड्यात कोणता स्पर्धक बाहेर जाईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या आठवड्यासाठी एकूण ४ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

पहिल्या आठवड्यात कोण झाले नॉमिनेट?

कोण जाणार घराबाहेर?

आतापर्यंत जेव्हा एखादा स्पर्धक नॉमिनेट व्हायचा, तेव्हा ज्याला सर्वात कमी मते मिळायची त्याला थेट घरातून बाहेर काढले जायचे. मात्र, यावेळी तसे होणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला दोन लाईफलाईन मिळाल्या आहेत. आता, सर्वात कमी मतं मिळालेला स्पर्धक एलिमिनेट होणार नाही, पण तो एक लाईफ गमावेल. जो स्पर्धक दोन्ही लाईफबोट्स गमावेल, तो शोमधून एलिमिनेट होईल. त्यामुळे आता घराबाहेर कोण जाणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांनुसार, अरिशफा खान , उदिती सिंह यांपैकी एक जण आपली एक लाईफ गमावेल.

'बिग बॉस २०' मध्ये १६ स्पर्धक शोमध्ये सामील झाले आहेत. तसेच 'बिग बॉस २०' च्या पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये देखील तुफान राडा होताना दिसला. पहिला घराचा कॅप्टन कोण होणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. आतापर्यंत शोमध्ये दोन मोठी भांडणे झाली आहेत. पहिले, मिमिक्रीवरून काझी आणि यंग यांच्यात भांडण झाले. त्यानंतर अर्शिफाचा आम्रपाली दुबे आणि माही विज यांच्याशी वाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

SCROLL FOR NEXT