'बिग बॉस २०'मध्ये शॉकिंग एविक्शन
या आठवड्यात रोहित शेट्टी करणार 'वीकेंड का वार' होस्ट
माही वीज झाली घराची कॅप्टन
'बिग बॉस २०'चा खेळ दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत जात आहे. या आठवड्यात माही वीज घराची कॅप्टन झाली आहे. माही बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून घरात एक्टिव्ह दिसते. आपली प्रत्येक मते ती ठामपणे मांडते. आज प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी 'वीकेंड का वार' होस्ट करणार आहे. अशात आता य आठवड्याच्या एलिमिनेशन बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
BBTak च्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस २०' च्या या आठवड्यात बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम घराबाहेर पडणार आहे. हे आतापर्यंतचे सर्वात शॉकिंग एलिमिनेशन असणार आहे. शोमध्ये मेरी कोमचा खेळ नुकताच दिसू लागला होता. दरम्यान, मेरी कोमचे घरातील सदस्यांसोबतचे नातेही दिसून येत होते, ज्याचा चाहते आनंद घेत होते. त्यामुळे, तिचे शोमधून बाहेर पडणे चाहत्यांसाठी एक मोठा धक्का आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
गेल्या आठवड्यात अभिनेता अमन गांधी शोमधून बाहेर पडला होता. 'बिग बॉस २०' च्या घरात १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. रोहिद खान, ईशा रिखी, रिती तिवारी, नकुल ढुल, अमन गांधी आतापर्यंत एलिमिनेट झाले आहेत. या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यात मेरी कोम, लव्ह गिल, अर्शिफा खान, गुल्लू, आम्रपाली दुबे, मनीष गोयल आणि उदिती सिंग यांचा समावेश होता.
या आठवड्यात 'वीकेंड का वार' मध्ये रोहित शेट्टी कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच 'वीकेंड का वार' मध्ये ॲक्शनचा धमाकाही पाहायला मिळेल. 'बिग बॉस २०' चा खेळ कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.