'बिग बॉस 19' चा विजेता गौरव खन्ना ठरला.
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.
गौरव खन्ना आणि आकांक्षाचा प्रेम विवाह आहे.
'बिग बॉस 19' चा (Bigg Boss 19 ) विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna Love Story ) टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिका आणि रिॲलिटी शोमध्ये झळकला आहे. तो 'मास्टरशेफ सेलिब्रिटी'चा विजेता देखील आहे. त्याला 'अनुपमा' मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. गौरव खन्नाने अभिनेत्री आकांक्षा चमोलाशी (Akanksha Chamola ) लग्न केले. बिग बॉसच्या घरात गौरव आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. त्याची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.
गौरव खन्नाची प्रेम कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी रंजक आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. एका ऑडिशन दरम्यान गौरव आणि आकांक्षा यांची भेट झाली. आकांक्षाला तेव्हा गौरव खन्ना एक अभिनेता आहे हे माहित नव्हते म्हणून तिने त्याला अभिनयाचे सल्ले दिले. त्यामुळे गौरवने आकांक्षाला आपली खोटी ओळख करून दिली. कारण त्याला आकांक्षाला आपली खरी ओळख कळू द्यायची नव्हती. गौरव खन्नाला पहिल्या नजरेत आकांक्षावर प्रेम झाले.
एकदा गौरवने आकांक्षाला लिफ्ट दिली. गाडीत बसून आकांक्षाला गौरव खन्ना नाव सर्च करायला सांगितले. तेव्हा आकांक्षाला समजले की हा एक अभिनेता आहे. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात. काही काळानंतर गौरवने आकांक्षाला रोमँटिक स्टाइलमध्ये प्रपोज केले. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2016 ला या जोडप्याने लग्नगाठ बांधली. गौरवच्या मूळ गावी, कानपूर येथे दोघांनी लग्न केले. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. गौरव आणि आकांक्षामध्ये तब्बल 9 वर्षांचे अंतर आहे.
'बिग बॉस 19' च्या घरात गौरव खन्ना युट्यूबर मृदुल तिवारीशी गप्पा मारत होता. तेव्हा म्हणाला की, मला वडील व्हायचे आहे. अशी माझी खूप इच्छा आहे. मला आणि आकांक्षाच्या लग्नाला नोव्हेंबरमध्ये नऊ वर्षे पूर्ण होतील. मला मुलं खूप आवडत असतील तरी आकांक्षाला आता मुल नको आणि तिच्या या निर्णयाचा मी पूर्णपणे आदर करतो. गौरवने पुढे स्पष्ट केले की पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांबद्दल आकांक्षाच्या चिंता तो समजतो.दोघांचेही करिअर व्यस्त असल्याचे तो बोलतो. आकांक्षा जेव्हा फॅमिली वीकमध्ये घरी येते. तेव्हा ती देखील मुलांच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.