Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : हीच सून हवी! "तू २६ चा, ती २१ ची"; कुनिकानं ठरवलं मुलाचं लग्न,पाहा VIDEO

Bigg Boss 19 - Family Week : बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकला सुरुवात झाली आहे. कुनिकाला भेटायला तिचा मुलगा घरी आला आहे. कुनिका बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला आपली सून म्हणते.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये फॅमिली वीकला सुरुवात झाली आहे.

घरात कुनिकाच्या मुलाची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

कुनिकाने 'बिग बॉस 19'च्या घरातील एका सदस्याला सून म्हणून पसंत केले आहे.

'बिग बॉस 19' आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. घरात फॅमिली वीकला सुरुवात झाली आहे. यामुळे घरातील वातावरण खूपच आनंदी पाहायला मिळत आहे. बिग बॉसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात 'बिग बॉस 19' च्या घरात कुनिकाच्या मुलाची एन्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण कुनिकाने आपल्या सूनेबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे.

फॅमिली वीकमध्ये कुनिकाला भेटायला बिग बॉसच्या घरात तिचा मुलगा अयान येतो. अयानच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळतो. तो घरातील सदस्यांसोबत खूप मजा-मस्ती करतो. मुलाल अचानक पाहून कुनिकाला खूप आनंद होतो. दोघे खूप रडतात. त्यानंतर कुनिका मुलाला घरातील सदस्यांची ओळख करून देत असते. तेव्हा ती एका सदस्याला आपली सून म्हणून बोलते.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुनिका मुलाला बोलते की, "अशनूर 21 वर्षांची आहे आणि तू 26 वर्षांचा आहे. तो बहू बनानी ही..." हे ऐकून अशनूर कौर हसते. त्यानंतर गौरव बोलतो की, "घरातील सर्व मुली रिजेक्ट... कुनिका जी म्हणतात अशनूर इज Good" त्यानंतर घरातील सर्वजण हसू लागतात. कुनिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते व्हिडीओवर कमेंटे्स करत आहेत.

'बिग बॉस 19'च्या घरात आता फक्त 9 सदस्य बाकी आहेत. लवकरच 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. प्रेक्षक 'बिग बॉस 19'चा विजेता कोण, हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गौरव, प्रणित, अमाल, अशनूर, कुनिका, तान्या, फरहाना, मालती आणि शहबाज हे 9 सदस्य बिग बॉसच्या घरात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Side Effects: आवळा कोणी खाऊ नये?

Maharashtra Live News Update: देवळाली कॅम्पच्या लहवित परिसरात बिबट्याच दर्शन

Feet Tanning : 10 मिनिटांत पाय होतील गोरे, फॉलो करा या ३ स्टेप

Winter Health : हिवाळ्यात थंड पाणी पिण्याचे फायदे, मात्र लक्षात ठेवा 'ही' महत्त्वाची गोष्ट

Bharti Singh: 'लाफ्टर शेफ्स 3'च्या टीमकडून भारती सिंहला मिळलं बेबी शॉवर सरप्राइज, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT