Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : तेव्हा अजय देवगणने गमावली होती दृष्टी, सलमानने सांगितला सिंगमच्या शूटिंगचा किस्सा

Ajay Devgn Eye Injury : 'सिंघम अगेन'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली होती. याचा किस्सा बिग बॉसच्या मंचावर सलमान खानने सांगितला.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' मध्ये (Bigg Boss 18) रोज एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसचे घर दोन सदस्यांना सोडावे लागले. बिग बॉसच्या घरातून मुस्कान बामने आणि नायरा बॅनर्जी यांची एक्झिट झाली आहे. या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने (Salman Khan ) सदस्यांची शाळा घेतली. विशेषता अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहराची शाळा घेतली.

यंदाचा 'वीकेंड का वार' खूप गाजला कारण या शो वर 'सिंघम अगेन' चे कलाकार आले होते. सलमान खानच्या शोवर रोहित शेट्टी आणि अजय देवगणने उपस्थिती लावली होती. रोहित शेट्टीने बिग बॉसच्या घरात सदस्यांसोबत गेमही खेळला. 'सिंघम अगेन'मध्ये आपल्याला सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या मंचावर हे तीन कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधताना पाहायला मिळाले. तेव्हा सलमान खानने 'सिंघम अगेन' च्या (Singham Again) चित्रीकरणादरम्यान अजय देवगणसोबत घडलेली एक घटना सांगितली.

सलमानने 'सिंघम अगेन' च्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजयला डोळ्याला झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले. भाईजान म्हणाला की, "अजयला (Ajay Devgn) मारायला एक व्यक्ती लाकूड घेऊन येत होती. तेव्हा त्याची वेळ चुकली आणि अजयच्या डोळ्याला लाकडाचा फटका बसला. यामुळे अजयला दोन-तीन महिने दिसत नव्हते. त्याचे ऑपरेशन देखील झाले. यानंतर त्याचा डोळा बरा झाला. "

'सिंघम अगेन'चा ट्रेलर पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर आणि टायगर श्रॉफ देखील आहे. 'सिंघम अगेन' १ नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉसच्या घरात आता नवीन काय राडा होणार आणि या आठवड्यात कोण घराचा निरोप घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

SCROLL FOR NEXT