Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'नहीं हो रही है हिंदी में बात...' भाषेवरून बिग बॉससोबत सदस्याची तू तू मैं मैं

Eisha Singh : बिग बॉसच्या घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. आता चक्क घरात भाषेवरून बिग बॉससोबत सदस्य भांडत आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा भाषेवरून घरात वादविवाद झाले आहेत. ईशा सिंह चक्क बिग बॉससोबत वाद घालताना पाहायला मिळत आहे. तिने इंग्रजी भाषेसाठी बिग बॉसला सुनावले आहे.

बिग बॉसच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ईशा सिंह (Eisha Singh) चक्क बिग बॉससोबत तूतू-मैमै करत आहे. हिंदी शोमध्ये इंग्रजी बोल्यामुळे बिग बॉसने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ईशा घरात चुम दरांगसोबत बोलताना दिसत आहे. तेव्हा अचानक बिग बॉस ईशाला थांबवून हिंदी भाषेत संवाद करण्यास सांगतात. तेव्हा ईशा बिग बॉसवर भडकते. ती म्हणते की, "मला नाही हिंदीत बोलता येत. मी इंग्रजी भाषेत बोलण्यात जास्त कंफर्टेबल आहे. मला माहित नाही हिंदीत कसा संवाद साधतात." आता ईशाने हिंदी बोलायला बिग बॉसच्या घरात नकार दिल्यामुळे तिच्यावर बिग बॉस कोणती कारवाई करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सलमान खानने बिग बॉसचं शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. आता 'वीकेंडच्या वार'ला नवीन धमाका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. ईशाने अनेक गाजलेले शो केले आहेत. तिने आपल्या अभिनयाने अनेक युथच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ती अनेक वेळा घरात इंग्रजीमध्ये बोलता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT