Munawar Faruqui Meets Shubman Gill Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munawar Faruqui: बिग बॉस विनर मुनव्वर फारुकी आणि शुभमन गिलची ग्रेट भेट, फोटो होतोय व्हायरल

Munawar Faruqui With Sbhubhaman Gill: मुनव्वर फारुकी आणि शुभमन गिल यांचा एकत्र फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की ते एकत्र पोज देत आहेत. या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. मुनव्वर आणि शुभमन या दोघांनीही काळ्या रंगाची ड्रेसिंग केली आहे.

Priya More

Munawar Faruqui Meets Shubman Gill:

'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) विनर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केल्यापासून आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून मुनव्वर सतत पार्टी करताना दिसत आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच मुनव्वरने टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिलची (Shubhaman Gill) भेट घेतली. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोची सळ्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

मुनव्वर फारुकी आणि शुभमन गिल यांचा एकत्र फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की ते एकत्र पोज देत आहेत. या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. मुनव्वर आणि शुभमन या दोघांनीही काळ्या रंगाची ड्रेसिंग केली आहे. मुनव्वर साध्या काळ्या कुर्त्यात दिसत होता. तर शुभमनने त्याच रंगाचा प्रिंटेड शर्ट घातला होता आणि तो नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता.

मुनव्वर आणि शुभमनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरूवात केली आहे. मुनव्वर फारुकीसोबत शुभमन गिलला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की, हे दोघे एकत्र का आहेत? मुनव्वर 'फारूकी बिग बॉस 17' च्या विजयाचा आनंद घेत आहेत. तो सतत पार्टी करताना दिसतोय. त्याचवेळी शुभमन गिल नुकताच मुंबईत रोहन बापन्नाच्या पार्टीत गेला होता.

मुनव्वर फारुकीने 5 फायनलिस्ट म्हणजे अभिषेक कुमार, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण मशेट्टी यांना हरवून बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती. अभिषेक कुमार फर्स्ट रनर अप ठरला. त्याच्या 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने एक पार्टी देखील आयोजित केली होती. ज्यामध्ये तो अभिनेता करण कुंद्रा आणि पारस कालनावत आणि इतरांसह डान्स करताना दिसला होता. 'बिग बॉस 17' च्या सर्व स्पर्धकांनी बिग बॉसच्या लेटेस्ट पार्टीला हजेरी लावली. ज्यामध्ये सर्वांनी खूप धम्माल केली. या पार्टीत मुनव्वर 'ॲनिमल' चित्रपटामधील प्रसिद्ध गाणं 'जमाल कुडू'वर डोक्यावर बॉटल ठेवून जबरदस्त डान्स करताना दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT