Vicky Jain On Ankita Lokhande Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: मी बायकोच्या आदेशावर चालणाऱ्यांपैकी नाही, अखेर विकी जैन अंकिताबद्दल असं का म्हणाला?

Vicky Jain And Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि विकी या दोघांचे सततचे रुसवे आणि फुगवे सर्वजण पाहत आहेत.

Priya More

Vicky Jain On Ankita Lokhande:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या शोमधील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये सोबत एन्ट्री घेतलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये सतत वाद होताना दिसत आहे.

अंकिता आणि विकी या दोघांचे सततचे रुसवे आणि फुगवे सर्वजण पाहत आहेत. अशामध्ये आता विकी जैन अंकिताबद्दल असं काही बोलून गेला आहे त्यामुळे त्यांचे चाहते विचारात पडले आहेत. 'मी बायकोच्या आदेशावर चालणाऱ्यांपैकी नाही', असं विकी म्हणाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घडलं असं की, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या रेशनबाबत मोठा गोंधळ झाला आहे. रविवारच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये खाद्यपदार्थांवरून जोरदार भांडण झाले. बिग बॉसचे सर्व स्पर्धक कॉफीबद्दल खूप चिंतेत दिसले. आता कुणीतरी सदस्यांना मिळालेल्या रेशनमधून कॉफी लपवली. त्यानंतर घरातील सदस्य आपापसात भांडू लागले.

मुनावर फारुकीने अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्याशी वाद घातला आणि सांगितले की तो हरवलेल्या कॉफीचा शोध घेत आहे. मुनव्वरसोबत वाद झाल्यानंतर विकी जैन, सना रईस खानसोबत गार्डनमध्ये बसला. तर अंकिता खानजादी आणि ऐश्वर्यासोबत दुसऱ्या कोपऱ्याला जाऊन बसली.

यादरम्यान सनाने विकीला सांगितले की, त्याने तिच्यासाठी स्टँड घ्यावा. कारण सना विकीच्या मैत्रीबद्दल गोंधळलेली आहे. सनाने सांगितले की, 'मी काही लोकांकडून ऐकले होते की, तुम्ही माझ्या पाठीमागे माझी चेष्टा करत आहात. तुम्ही मला नॉमिनेट करत आहात. त्यामुळे मी दुखावले गेले आहे.'

विकीने तिला उत्तर दिले की, आपली जी काही मैत्री आहे मी त्याचा आदर करतो.' तर सनाने पुढे सांगितले की, मलासुद्धा तुझ्यासोबत नातं असल्यासारखं वाटतं... मला वाटते की जर आपण दोघेही बुद्धिमान असतो तर आपण एकमेकांशी कनेक्ट झालो असतो.' विकीने सनाला सांगितले की, 'त्याला सर्व काही तिच्यासोबत शेअर करायचे आहे.'

अंकिताचा उल्लेख करताना सना म्हणाली, 'माझ्याकडे अंकिताबद्दल कधीच काही नव्हते. मी कधीच तिच्याबद्दल काही वाईट बोलले नाही. पण सोनिया ज्या गोष्टी बोलल्या, ते सगळे सांगतात. पण तिच्या शत्रुत्वाला काही कारण आहे का?"

यावर विकी जैनने तिला सांगितले की, 'मी पत्नीच्या सल्ल्याने निर्णय घेणारी व्यक्ती नाही. तुम्हाला माहिती आहे.' तर सना म्हणाली, 'तुम्ही आता माझ्यावर निष्ठा दाखवू शकता का? मी दर आठवड्याला स्वत:ला सिद्ध करून थकले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

SCROLL FOR NEXT