Bigg Boss 17  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: विकी-अंकिता बिग बॉसच्या घराबाहेर जाणार?, नव्या प्रोमोमुळे चाहते चिंतेत

Bigg Boss 17 Latest Promo: बिग बॉसच्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान विकीला खडेबोल सुनावताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Weekend Ka War Bigg Boss 17 :

'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. 'बिग बॉस 17' सीझन सुरू आहे. प्रेक्षक या सीझनला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. नुकताच शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोत वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान घरातील सर्व सदस्यांना चांगलेच सुनावताना दिसत आहे.

बिग बॉसमध्ये येत्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान ईशा, समर्थ जुरेल, अंकिता आणि विकीला चांगलेच धारेवर धरणार आहे. याचसोबत बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विकी आणि अंकिताला चांगलेच सुनावले आहे.

नुकत्याच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खान विकी आणि अंकिताला बिग बॉसचे नियम मोडल्याप्रकरणी चांगलच फटकारताना दिसत आहे. नियम मोडल्याप्रकरणी विकी जैन अडचणीत आल्याचे दिसत आहे.

प्रोमोमध्ये सलमान खान घरातील सर्व सदस्यांना विचारतो की, 'तुम्ही सर्वांनी बिग बॉसच्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली होती. त्यावर सर्व नियम व अटी स्पष्टपणे लिहल्या होत्या. किती लोकांनी हे नियम व अटी पाळले आहेत. तुम्ही सर्व बिग बॉसमध्ये येण्याच्या आधी कोण कोण एकमेकांशी बोलले होते?'

त्यावर विकी म्हणतो की, 'घरात येण्याआधी दोन दिवसांपूर्वी माझं आणि नीलचं फोनवर बोलणं झालं होतं'. त्यावर सलामन अंकिताला विचारतो की, 'तुला हे माहित होतं का?' अंकिता म्हणते, 'मला हे नंतर समजले'. यावर सलमान खान सनाला विचारतो की, 'याचा अर्थ काय होतो?' सना म्हणते, 'सर वायकॉमला अधिकार आहे की, ते यांना घराबाहेर काढू शकतात'.

या प्रोमोमुळे विकी आणि अंकिताच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. विकीने खरंच नियमांचे उल्लंघन केले आहे का? विकीने नियंमाचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर काय कारवाई होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT