Bigg Boss 17 Wild Card Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Wild Card Contestant: नवऱ्याच्या मदतीसाठी बिग बॉसच्या घरात ‘दबंग गर्ल’ करणार एन्ट्री, कोण आहे ‘ही’ प्रसिद्ध युट्यूबर?

Chetan Bodke

Bigg Boss 17 Wild Card Contestant

सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस १७’ची जोरदार चर्चा होत आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाचा सीझनही चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. ‘बिग बॉस १७’ची यंदाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी आहे. त्यामुळे सर्वांचाच वाद सध्या चर्चेत आहे. पहिल्याच दिवसापासून अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनमध्ये जोरदार वाद पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबतच नील आणि ऐश्वर्या हे कपल सुद्धा घरामध्ये बरेच चर्चेत राहते. या कपलमध्ये आणखी एका कपलची भर पडणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंकिता- विकी आणि नील- ऐश्वर्या नंतर आणखी एक कपल सहभागी होणार आहे. सध्या बिग बॉसमध्ये प्रसिद्ध युट्यूबर सनी आर्य खूपच चर्चेत आहे. त्याच्या खेळाचे सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूपच कौतुक होत आहे. लवकरच त्याची पत्नी दीपिका आर्यची बिग बॉस १७ च्या घरात एन्ट्री घेणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दीपिका कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या फ्री स्टाईलमुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. जर दीपिकाही ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये सहभागी झाली तर हे घरातलं तिसरे कपल ठरेल.

‘बिग बॉस १७’ सुरु होऊन लवकरच एक महिना पुर्ण होईल. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शोमध्ये, समर्थ जुरेलने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती. यामध्ये सध्या अनेक स्पर्धकांची चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, युट्यूबर राघव शर्मा, युट्यूबर एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान सुद्धा ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या यादीमध्ये सनी आर्यची पत्नी दीपिका आर्यचेही नाव चर्चेत आहे.

बिग बॉस 17मध्ये सध्या प्रेक्षकांना वाद आणि राडा पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धकामध्ये रोज कोणत्या ना कोणत्या तरी विषयामुळे वादाचे खटके उडताना दिसत आहे. सध्या अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यातही चांगलीच जुंपली आहे. आतापर्यंत सोनिया बन्सल आणि मनस्वी मॅग्माई शोमधून बाहेर पडली आहे. आता या आठवड्यात कोणता स्पर्धक घरातून बाहेर पडणार ?, याचं उत्तर प्रेक्षकांना शनिवारच्या एपिसोडमध्ये मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT