Orhan Awatramani Leave Bigg Boss 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Orry Leave Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून ओरीने एका दिवसातच खेळ आटोपला, ‘या’ कारणामुळे त्याला सोडावे लागले घर

Bigg Boss 17 Episode Latest Updates: स्टारकिड्सचा बेस्टफ्रेंड असलेल्या ओरीने बिग बॉसच्या घरातून कालच्या ‘विकेंड का वार’ मधून शोमधून काढता पाय घेतला आहे. त्याच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Chetan Bodke

Orhan Awatramani Leave Bigg Boss 17

गेल्या आठवड्यामध्ये बिग बॉस १७ च्या घरात बॉलिवूड स्टारकिड्सचा बेस्टफ्रेंड म्हणून चर्चेत राहणाऱ्या ओरीने एन्ट्री घेतली. त्याच्या एन्ट्रीने फक्त स्पर्धकांचेच नाही तर, सलमान खानचेही त्याने लक्ष वेधले. यंदाचा ‘विकेंड का वार’ सर्वांसाठीच खास ठरला. पण ज्याच्या एन्ट्रीने बिग बॉसचे घर खास ठरले, तो फक्त दोन दिवसातच घराबाहेर पडला. ओरी फक्त दोन दिवसातच का घराबाहेर पडला? असा सर्वांनाच प्रश्न पडला.

यंदाच्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमानने खानझादी आणि मन्नारा चोप्राला आपल्या खास शैलीने चांगलेच फटकारले आहे. तर दुसरीकडे अंकिता आणि विकीच्या आईने दोघांनाही खेळावरुन चांगलेच झापले आहे.

या कारणामुळे जरी ‘विकेंड का वार’ चांगलाच वादळी ठरला असला तरी, ओरीच्या एन्ट्रीने घरातले वातावरण खुपच खेळीचे झाले. अनेक स्टारकिड्सचा बेस्ट फ्रेंड असलेल्या ओरीने ‘विकेंड का वार’मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केली होती.

घरात येताच ओरीने सर्वांचेच मन जिंकले. पण जरीही असं असलं तरी तो रविवारी शोमधून बाहेर पडला. ओरीने फक्त एका दिवसातच शो सोडला आहे. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

प्रत्येक रविवारप्रमाणे या रविवारी सुद्धा ‘जस्ट चिल्ड विथ सोहेल अँड अरबाज’ सेशन झाला. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांसोबतच धमाल मस्ती केली. यंदाच्या विकेंडला त्यांच्यासोबत ओरीही होता. ओरीने आपल्या खास शैलीने सर्वांचेच खळखळून मनोरंजन केले. ओरी बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार अशी चर्चा होत होती. पण त्याने फक्त विकेंडला सलमानसह सर्वांचेच निखळ मनोरंजन करण्यासाठी हजेरी लावली होती. (Bollywood News)

याबद्दलची माहिती सोहेल आणि अरबाजने ‘जस्ट चिल्ड विथ सोहेल अँड अरबाज’ सेशनमध्ये सांगितली. ज्यावेळी त्याने सर्वांचीच रजा घेतली तेव्हा सर्वच स्पर्धकांचे डोळे पानावले होते. त्याच्या खास शैलीने सर्वांचेच मन जिंकले. शनिवारी रात्री ‘द आर्चीज’च्या एका कार्यक्रमामध्ये ओरी स्पॉट झाला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर तो घरातून बाहेर पडल्याची चर्चा झाली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT