Karan Johar On Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande ला सासूने मारले टोमणे, Karan Johar ने नाराजी व्यक्त करत Vicky Jain लाच सुनावले खडेबोल; नेटिझन्सनीही केलं ट्रोल

Karan Johar On Vicky Jain: बिग बॉसचा यंदाचा 'विकेंड का वार' हा स्पेशल एपिसोड खूपच धमाकेदार होणार आहे. हा विकेंड का वार सलमान खानऐवजी प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला. करणने यावेळी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

'बिग बॉस 17'ची स्पर्धक अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. फॅमिली वीकमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये आलेली अंकिता लोखंडेची सासू रंजना जैनने तिच्यावर नाराजी व्यक्त करत तिला टोमणे मारले होते. विकीला अंकिताने लाथ मारली होती त्यावर रंजना या नाराज असून त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर अंकिताची शाळा घेतली होती. रंजना यांनी अंकिताच्या कृत्याचा निषेध केला आणि सर्व दोष तिच्यावर टाकले. रंजना यांच्या या वागण्यामुळे अंकिताचे चाहते नाराज झाले आहेत. अंकिताला सपोर्ट करत अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याचसोबत अंकिताचे चाहते देखील संतप्त झाले आहेत.

बिग बॉसचा यंदाचा 'विकेंड का वार' हा स्पेशल एपिसोड खूपच धमाकेदार होणार आहे. हा विकेंड का वार सलमान खानऐवजी प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला. करणने यावेळी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी करण जोहरने अंकिताला सासूने दिलेल्या टोमण्यावरून आणि तिला दिलेल्या वागणुकीवरून तिचा पती विकी जैनलाच खडेबोल सुनावले आहेत. तो विकिला म्हणतो की, 'जेव्हा तुझी आई अंकिताकडे येते आणि नॅशनल टेलिव्हिजनवर प्रश्न विचारते. तेव्हा एक पती म्हणून तू तिच्या मागे उभे राहिले पाहिजे होते. मी असे म्हणत नाही की तू तुझ्या आईविरुद्ध काहीही बोल. तू फक्त तिला विचारायचे होते 'काय झाले अंकिता?'

करण जोहरचं बोलणं ऐकून झाल्यानंतर विकी जैन अंकिता लोखंडेला विचारतो की, ‘ आई काय बोलली सांग?’ यावर अंकिता म्हणते की, ‘पप्पांनी माझ्या आईला फोन केला होता. ते आईला म्हणाले होते की तू तुझ्या नवऱ्याला अशीच मारत होती का चप्पल आणि बुटांनी.' यावर विकी जैन म्हणतो, 'तुझे पप्पा काय म्हणाले असते? एका वडिलांना ही फिलिंग येऊ शकते की नाही? तू तुझ्या गोष्टी कुठेच सांभाळू शकत नाही आणि अशाप्रकारे तू ते माझ्याकडे घेऊन येते. ते बरोबर दिसत नाही नॅशनल टेलिव्हिजनवर. हे तुला कधी समजणार?'

करण जोहरने विकीची चांगलीच शाळा घेतली. बिग बॉसचा हा प्रोमो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यानंतर नेटिझन्सनी देखील विकी जैनवर टीका केली आहे. त्यांनी विकीची शाळा घेणाऱ्या करण जोहरचे कौतुक केले आहे. त्याचसोबत त्यांनी करण जोहरला सलमान खाननंतर सर्वात सक्षम होस्ट असल्याचे श्रेय दिले आहे. तर काहींनी विकी वडिलांच्या कृतीचे समर्थन करत असल्याची देखील टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

भीषण अपघात; एका सेकंदात स्कुटीचा चक्काचूर, भयानक अपघाताची घटना CCTV मध्ये कैद |Video Viral

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

SCROLL FOR NEXT