Bigg Boss 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

BB17 Contestants List: 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करताच सेलिब्रिटींचा जोरदार राडा, शोमध्ये सहभागी झाले 'हे' १७ स्पर्धक

Bigg Boss 17 Contestants List: बिग बॉसच्या सेटवर ईशा आणि अभिषेक यांच्यातील भांडण खूपच रंगले. पहिल्याच दिवशी भांडण सुरू झाल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Priya More

Bigg Boss 17 Contestants List

लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 17' (Bigg Boss 17) रविवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खान हा शो होस्ट करत आहे. सलमान खानच्या या शोचा भव्य प्रीमियर नुकताच पार पडला.

या शोमध्ये १७ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेतली. महत्वाचे म्हणजे घरात जात नाही, एकमेकांची ओळख होत नाही तोवरच या सेलिब्रिटींनी भांडण करायला सुरूवात केली. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये आता भांडण, राडे प्रेक्षकांना पहायला मिळणार हे नक्की.

बिग बॉसच्या घरामध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली. त्यांच्यासोबत नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्या, अनुराग ढोबळ, जिग्ना व्होरा, मुनावर फारुकी, फिरोजा खान उर्फ खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना राणा खान आणि सोनिया बन्सल या सेलिब्रिटींनी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला. या सर्व स्पर्धकांनी धमाकेदार एन्ट्री केली. आता हे सर्व सेलिब्रिटी या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी एकत्र धमाकेदार एन्ट्री घेतली. 'उडारियां'फेम अभिनेता अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी बिग बॉसच्या सेटवर येताच भांडण सुरू केले. दोघेही सलमान खानसमोर भांडू लागले. दोघांनीही एकमेकांवर आपला राग एकमेकांवर काढला. यावेळी ईशा मालवीय इतकी भावुक झाली की ती रडायला लागली. शेवटी सलमान खानने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

बिग बॉसच्या सेटवर ईशा आणि अभिषेक यांच्यातील भांडण खूपच रंगले. पहिल्याच दिवशी घरामध्ये एन्ट्री करताच त्यांचे भांडण सुरू झाल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनी एकमेकांवर आरोप केले. ईशाने अभिषेकवर शारीरिक हिंसक असल्याचा आरोप केला होता. अभिषेकने सांगितले की, ईशाने त्याच्या चेहऱ्यावर नखं मारली होती. दोघांनीही त्यांच्या मनात असलेली कटुता बाहेर काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT