Abhishek Kumar And Sunny Arya Fight Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातील शांती पुन्हा भंग, अभिषेक-तहलकामध्ये कडाक्याचे भांडण

Abhishek Kumar And Sunny Arya Fight Video: बिग बॉसच्या घरातील शांती पुन्हा भंग झाल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे. कारण अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि तहलका म्हणजेच सनी आर्या (Sunny Aarya) यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे.

Priya More

Bigg Boss 17 New Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून घरातील सदस्य देखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. नुकताच 'बिग बॉस १७' चा नवा प्रोमो समोर आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरातील शांती पुन्हा भंग झाल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे. कारण अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि तहलका म्हणजेच सनी आर्या (Sunny Aarya) यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे.

'बिग बॉस 17' चा नवीन प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, अरुण श्रीकांत 'दिल का घर'मध्ये येतो आणि ईशा मालवीयाला उठवतो. कारण ती आणि समर्थ जुरेल बेडवर झोपलेले त्याला दिसतात. यामुळे तो जोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, 'तु्म्ही इथे झोपायला आले आहेस का?' त्यावर ईशाही त्याला उत्तर देते आणि म्हणते, 'तू इथे जास्त ऑर्डर देऊ नकोस.' यानंतर अरुणचा अभिषेक कुमारसोबत देखील वाद होतो. त्यानंतर सनी आर्यामध्ये येतो आणि अभिषेकशी भांडू लागतो.

त्यानंतर या प्रोमोमध्ये असे दिलते की, सनी आर्य अभिषेकचा चेहरा धरून म्हणतो की, 'पुढच्या वेळी अरुणच्या मॅटरमध्ये येऊ नकोस. हे लक्षात ठेव.' यावेळी तो अभिषेकची कॉलर पकडतो आणि टी-शर्ट जोरात ओढू लागतो. मग अभिषेकनंतर रिंकू आणि घरातील बाकीचे सदस्य तहलकाच्या मागे लागतात. मात्र, तहलका देखील शांत बसत नाही. यादरम्यान त्याने अभिषेकला कानाखाली मारण्याची धमकी देतो आणि 'मी तुला मारले तर तुझं तोंड फोडून टाकेन', अशी धमकी देतो. जेव्हा तहलकाने अभिषेक कुमारला धक्का दिला तेव्हा तो मर्यादा ओलांडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

आतापर्यंत 'बिग बॉस 17'च्या घरामध्ये तहलकाने अनेक स्पर्धकांसोबत मारामारी केली आहे. त्याने बिग बॉसच्या घरातील मालमत्तेचीही तोडफोड केली आहे. अशा परिस्थितीत यावेळी तहलकाला याची शिक्षा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तहलकाला शोमधून बाहेर काढले जाऊ शकते, अशी शक्यता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण व्यक्त करत आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT