Bigg Boss 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'तू तुझ्या बायकोला कंट्रोल कर...', पती नील भट्टसोबत भांडणाऱ्या विकी जैनवर संतापली ऐश्वर्या शर्मा

Aaishwarya Sharma And Ankita Lokhande Fight: 'बिग बॉस 17'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये नील भट्ट (Neel Bhatt) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याचे दिसत आहे.

Priya More

Ankita Lokhande On Neel Bhatt:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदा बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. या स्पर्धकांमध्ये सततची भांडणं, वाद, राडे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशामध्ये सलमान खान (Salman Khan) 'विकेंड का वार'मध्ये या स्पर्धकांची चांगली शाळा घेताना दिसतो. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता लोखंडेवर (Ankita Lokhande) घरातील इतर सदस्य नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 17'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये नील भट्ट (Neel Bhatt) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याचे दिसत आहे. वीकेंडच्या स्पेशल एपिसोडमध्ये, नील आणि विकीचा गार्डन एरियामध्ये वाद होतो. जेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं सुरू असतात तेव्हा नीलची पत्नी ऐश्वर्या शर्मा रागाने येते आणि विकीवर संतापते. ऐश्वर्या रागाच्या भरात विकीला म्हणते की, 'तू तुझ्या बायकोला कंट्रोल कर.' त्यानंतर या वादामध्ये अंकिता लोखंडे उडी घेते आणि या दोघींची जोरदार भांडणं सुरू होतात.

बिग बॉस 17 च्या ताज्या एपिसोडमध्ये दिसत आहे की, अरबाज आणि सोहेल गेल्यानंतर नील भट्ट आणि विकी जैन यांच्यात भांडण सुरू होते. नील विकीला म्हणतो की, 'तू कोण आहेस… चोरी पे सीना जोरी.' मग विकी नीलला रिलॅक्स हो म्हणतो आणि ऐश्वर्याला त्याच्यावर कंट्रोल करण्यास सांगतो. दरम्यान, ऐश्वर्याला राग येतो आणि ती म्हणते, 'तू काय बोलला कंट्रोल कर..तू आधी स्वत:वर कंट्रोल कर. तुझ्या पत्नीवर कंट्रोल कर. तू मला कंट्रोल करशील. तू आहे तरी कोण?' तर ऐश्वर्याच्या कमेंटवर अंकिता लोखंडे म्हणते की, 'हेच आहे ऐश्वर्याचे वास्तव... नील काळजी घे, ऐश्वर्याची काळजी घे, तिला तुझी गरज आहे.'

ऐश्वर्या शर्मा रागाने अंकिताकडे येते आणि तिच्या हातातील सॉफ्ट टॉय खेचून घेते. ज्यावर अंकिता तिला म्हणते की,'हिम्मत करू नको. तू इथून जा. तुझा क्लास नको दाखवू.' अंकिता ऐवढ्यावर शांत बसत नाही. ती ऐश्वर्याला पुढे म्हणते की, 'जेव्हापासून ती शोमध्ये आली आहे तेव्हापासून तुझा नवरा भांडणात व्यस्त आहे.' ऐश्वर्या रागाने म्हणते, 'माझ्या नवऱ्याला तुझ्यासारख्या स्त्रीमध्ये रस नाही.' तर अंकिताला देखील राग येतो आणि ती म्हणते की, 'तुझ्या सारख्या बाईशी काय संबंध.' यावर ऐश्वर्या अंकिताला वाईट वर्तन करणारी महिला म्हणते. अशामध्ये ऐश्वर्या आणि अंकिता यांच्यातील हे कडाक्याचे भांडण पाहून घरातील इतर सदस्यांना चांगलाच धक्का बसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT