Ankita Lokhande And Vicky Jain Fight Saam Tv
मनोरंजन बातम्या

'आता विसरून जा की आपलं लग्न झालंय', पती Vicky Jain ला Ankita Lokhande ने मारली लाथ, कपलमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण

Ankita Lokhande And Vicky Jain Fight Video: आता बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अंकिता आणि विकीमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसत आहे. अंकिताने संतप्त होत विकीला लाथ मारली.

Priya More

Bigg Boss 17 New Promo Video:

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती बिझनेसमन विकी जैन (Vicky Jain) सध्या 'बिग बॉस १७' च्या (Bigg Boss 17) घरातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यापूर्वी या कपलमधील जीवापाड प्रेम सर्वांना पाहायला मिळत होते.

पण बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सतत या दोघांमध्ये रुसवे-फुगवे, भांडण होत असल्याचे दिसत आहे. या भांडणानंतर दोघेही एकमेकांची समजूत काढतात आणि परत काही कारणास्तव भांडू लागतात. आता बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अंकिता आणि विकीमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना वेगवेगळ्या घरामध्ये ठेवण्यात आले आहे. आधी एकाच घरामध्ये असलेले हे दोघे दोन वेगवेगळ्या घरामध्ये राहताना आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉस अनाऊंसमेंट करत विकी जैनला दिमागच्या घरामध्ये राहण्यास सांगतात. त्यानंतर विकी अंकिताच्या घरातून निघून जातो. त्यामुळे ती खूपच नाराज आणि अस्वस्थ झाल्यासारखी दिसते.

अंकिताला पाहून बिग बॉस तिला विचारतात की, 'तू खूपच अस्वस्थ दिसत आहेत. तुला काय झालं आहे?', त्यानंतर ते तिला म्हणतात की, 'तू ज्या व्यक्तीच्या जाण्याने अस्वस्थ झाली आहे ती व्यक्ती दिमागच्या खोलीमध्ये खूपच खूश असून आनंदात नाचत आहे.' हे ऐकून अंकिताला प्रचंड राग येतो आणि ती विकीवर संतप्त होते.

प्रोमोमध्ये पुढे दिसत आहे की, विकी अंकिता जवळ येतो. अंकिता आणि विकी दोघेही भांडताना दिसतात. अंकिता विकीला लाथ मारते. 'तू माझा वापर केलास, आपलं लग्न झालंय हे तू विसरून जा.' असं ती विकीला म्हणते. अंकिता पुढे असे देखील म्हणते की, 'तू इथून निघून जा. तू माझ्याशी काहीही बोलू नकोस. तुझ्यासोबत राहून मी खरंच वेडी झाली आहे. आपलं लग्न झालंय हे तू आता विसरून जा. आजपासून तू वेगळा आहेस आणि मी वेगळी आहे. तू आधीपासूनच लबाड वागला आहेस. तू माझा वापर केला आहेस.'

बिग बॉसच्या या प्रोमोमध्ये पुढे घरातील सदस्यांची भांडणं देखील दाखवण्यात आली आहेत. अनुराग डोभाल आणि अरुण माशेट्टी यांचे देखील कडाक्याचे भांडण होते. या भांडणात संतप्त होत ते घरातल्या स्वयंपाक घरातील वस्तूंची तोडफोड देखील करतात. त्यानंतर बिग बॉस आदेश देत घरातील स्वयंपाक घर बंद करण्याची घोषणा करतात. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य चिंतेत येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT